कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करा ः शिंदे

कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करा ः शिंदे
कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करा ः शिंदे

परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. उत्पादित केलेल्या शेतमालाची गटाने एकत्रित येऊन विक्री करावी, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित ‘दुष्काळी परिस्थितीत घ्यावयाची फळबागाची निगा’ या विषयावरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये श्री. शिंदे बोलत होते. या वेळी कृषी विद्यावेत्ता डाॅ. यू. एन. आळसे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. आर. सराफ, केव्हीकेचे अमित तुपे आदी उपस्थित होते.

यावेळी डाॅ. आळसे आणि तुपे यांनी दुष्काळी स्थितीत फळबागांची निगा आणि उपाययोजना या बाबत माहिती दिली. योगेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. तर रमेश ईक्कर यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com