पंतप्रधान मोदी यांचा महिला बचत गटातील सदस्यांशी संवाद

पंतप्रधान मोदी यांचा महिला बचत गटातील सदस्यांशी संवाद
पंतप्रधान मोदी यांचा महिला बचत गटातील सदस्यांशी संवाद

सोलापूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबकास्टिंगद्वारे महिला बचत गट सदस्यांशी साधलेल्या सुसंवादाच्या कार्यक्रमाचे  थेट प्रक्षेपण मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले. या वेळी विविध महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या. या निमित्ताने कृषिपूरक उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी पुण्यातील स्वयं शिक्षण प्रयोगाचे राज्य कार्यक्रम अधिकारी किरण माने, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका समन्वयक राजरत्ना जावळे उपस्थित होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि स्वयं शिक्षण प्रयोगांतर्गत असलेल्या बचत गटातील महिलांनी कार्यक्रमात भाग घेतला.

पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विविध राज्यांतील महिला बचत गटातील महिलांशी थेट सुसंवाद साधून महिला बचत गटांनी केलेल्या उल्लेखनीय कार्य, व्यवसाय व उत्पादने आदीचा आढावा घेतला. महिला बचत गटांनी त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जेम (GeM) पोर्टलवर नोंदणी करावी, असे अवाहन त्यांनी केले. कृषिपूरक उद्योग आणि शेतीमाल मूल्यवर्धनावर अधिकाधिक भर देण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने विविध कृषिपूरक उद्योगांचे महत्त्व डॉ. नांद्रे यांनी कार्यशाळेत विषद केले. महिला बचत गटांना विविध उद्योग उभारणीसाठी लागणारे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिला बचत गटांसाठी अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी, पॅकेजिंग व गुणवत्ता नियंत्रण या विषयावर विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. तानाजी वळकुंडे, काजल जाधव यांनी यांनीही मार्गदर्शन केले. अजय दिघे े. काका अडसुळे, रेश्मा राऊत, योगेश बोडके, महेश ढवळे, सुयोग ठाकरे, तुषार आहिरे, नरेंद्र जाधव, संजय बनसोडे, ज्ञानेश्वर तांदळे, अरुण गांगोडे यांनी सहकार्य केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com