agriculture news in marathi, Taluka Agri officer caught in taking five lakh brieb | Agrowon

एजंटामार्फत ५ लाखांची लाच घेणारा तालुका कृषी अधिकारी ताब्यात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 मार्च 2018

जालना : समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीवरील झाडांचे मूल्यांकन वाढवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन व्यक्‍तींना मंगळवारी (ता. २७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर व राउंडही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, ही लाच संशयित तालुका कृषी अधिकारी रामेश्‍वर रोडगे याच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रोडगे यालाही ताब्यात घेतले आहे.

जालना : समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीवरील झाडांचे मूल्यांकन वाढवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन व्यक्‍तींना मंगळवारी (ता. २७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर व राउंडही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, ही लाच संशयित तालुका कृषी अधिकारी रामेश्‍वर रोडगे याच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रोडगे यालाही ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार यांची जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. कृषी विभागामार्फत या शेतजमिनीतील झाडांचे तीन कोटी एक लाख रुपये मूल्यांकन काढण्यात आले होते; मात्र काही दिवसांनंतर उपविभागीय कार्यालयातून झाडांचे मूल्यांकन हे दोन कोटी सतरा लाख रुपये करण्यात आल्याची माहिती तक्रारदार यांना मिळाली. त्यामुळे तक्रारदारांनी झाडांचे फेरमूल्यांकन करण्यासंदर्भात अर्ज दिला.

याच काळात तालुका कृषी अधिकारी रोडगे याचा एजंट संशयित सुभाष गणपतराव खाडे (वय ४०, रा. जांबसमर्थ, ता. घनसावंगी, जि. जालना) याने तक्रारदारांची भेट देऊन कृषी अधिकारी रामेश्‍वर रोडगे यांनी पाठविल्याचे सांगत झाडांच्या मूल्यांकनवाढीसाठी २० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यावर तक्रारदार यांनी एजंट सुभाष खाडे आणि संशयित अनंत बाबूराव नाल्टे ऊर्फ माने (वय ६८, रा. रवळगाव, ता. सेलू, जि. परभणी) या दोघांना पाच लाख रुपये दिले; तसेच साडेसात लाखांचे दोन चेक दिले. त्यानंतर काही दिवसांनी तक्रारदार यांच्या खात्यात संपादित झाडे व इतर मिळून आठ कोटी रुपये जमा झाले.

दरम्यान, तक्रारदार यांच्या पाच वर्षांच्या मुलाच्या नावे असलेली शेतजमीन देखील समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. या शेतजमिनीवरील झाडांचे कृषी विभागाकडून ३९ लाख रुपयांचे मूल्यांकन करण्यात आले; परंतु तक्रारदार यांनी उपविभागीय कार्यलयामध्ये माहिती घेतली असता, या झाडांचे मूल्यांकन हे १६ हजार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा फेरमूल्यांकनासाठी अर्ज दिला. त्या वेळी या संदर्भात खाडे व मानेसोबत बोलणी झाली असता, पूर्वीच्या कामाचे १५ लाख रुपये दिले नाही तर मूल्यांकनात बदल होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. २७) नूतन वसाहत येथील उड्डाण पुलाखाली लाचेची रक्कम स्वीकारताना अनंत बाबूराव नाल्टे ऊर्फ माने व सुभाष गणपतराव खाडे या दोघांना ताब्यात घेतले; तसेच त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर व राउंड जप्त केले आहेत. शिवाय, त्यांचे वाहनही जप्त केले. याप्रकरणी संशयित तालुका कृषी अधिकारी रामेश्‍वर अण्णासाहेब रोडगे, अनंत बाबूराव नाल्टे ऊर्फ माने, सुभाष गणपतराव खाडे आणि बाळासाहेब ज्ञानोबा वाघमारे (रा. रवळगाव, ता. सेलू, जि. परभणी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या चार संशयितांविरोधात कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...