लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत' जाळ्यात

लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत' जाळ्यात
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत' जाळ्यात

अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके काढण्यासाठी लाच मागणाऱ्या अकोट तालुका कृषी अधिकाऱ्याला शनिवारी (ता. १७) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली.  तक्रारकर्त्याने केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे याने एक लाख ६० हजार रुपयांची मागणी केली होती. यापैकी एक लाख रुपयांचा धनादेश आधीच स्वीकारला असून शनिवारी ६० हजार रुपये नगदी देण्याची मागणी केली होती. मात्र यासंदर्भात तक्रारकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी (ता. १६) पडताळणी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास अकोट येथील कृषी कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ठाकरे याला ताब्यात घेतले. यामध्ये आणखी काही जणांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक संजय गोरले यांच्या पथकाने केली. ठाकरे हा तीनच वर्षांपूर्वी कृषी विभागात रुजू झाला असून परिविक्षा कालावधीसुद्धा अद्याप संपलेला नाही. त्यापूर्वीच त्याच्याविरुद्ध ही कारवाई झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com