agriculture news in marathi, Taluka-level workshops for water works | Agrowon

जलसंधारण कामांसाठी तालुकानिहाय कार्यशाळा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

वाशीम : जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बुधवार (ता. १९) ते सोमवार (ता. २४) या दरम्यान विविध तालुकानिहाय कार्यशाळा घेतल्या जाणार अाहेत. बुधवारी वाशीम व मालेगाव या तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली.

वाशीम : जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बुधवार (ता. १९) ते सोमवार (ता. २४) या दरम्यान विविध तालुकानिहाय कार्यशाळा घेतल्या जाणार अाहेत. बुधवारी वाशीम व मालेगाव या तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली.

उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उपस्थितांना विविध प्रकारच्या सूचना करण्यात अाल्या. यात सर्व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन शिवारफेरी करायची आहे. त्यासाठी शिवारफेरीचे वेळापत्रक तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी तयार करून द्यायचे आहे. या वेळी पूर्वीच्या गावात झालेली कामे व आता करावयाची कामे यांची माहिती संकलित करावयाची आहे. कोणतेही काम सुटणार नाही याची दक्षता घ्याची, नियोजन प्रपत्रात भरून देताना गाव नकाशा सादर करावा, प्रत्यक्ष सर्व गावांचे आराखडे प्राप्त झाल्यानंतर तालुक्याचे एक बुकलेट २५ सप्टेंबरपर्यंत तयार करावे, आराखडा करताना फक्त गाळ काढण्याचीच कामे न घेता जीबी, शेततळे, सीसीटी, डीसीटी, गैबियन, मातीनाला बांध अशी कामे सुचवावीत, असे या वेळी सांगण्यात आले.

२५ ते ३० सप्टेंबर दरम्यान तालुकानिहाय व यंत्रणानिहाय सादरीकरण जिल्हा समिती समोर करावे, उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या तालुकानिहाय पहिल्या तीन गावांना, दोन तालुक्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित केले जाईल. आराखडे झाल्यानंतर प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही १० ऑक्टोबरपर्यंत करावी, असे सांगण्यात अाले. जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने ही कामे होणार अाहेत.

इतर बातम्या
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
बांगलादेशातील रेशीम उद्योग...प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
म्हैसाळ उपसाचे मागणीअभावी काही पंप बंदसांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर...नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया...