नगरला चिंच प्रतिक्विंटल ९६०० ते १७९०० रुपये

चिंच
चिंच

नगर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात १० हजार २३८ क्विंटल चिंचेची आवक झाली आहे. चिंचेला ९६०० ते १७९०० रुपयांचा दर मिळाला. गहू, ज्वारीच्याही आवकेत वाढ होत आहे. भाजीपाल्याची आवक जेमतेम असून, दर फारसा वाढलेला नाही. नगर बाजार समितीत चिंचेची आवक वाढली आहे. येथे नगरसह औरंगाबाद, बीड, सोलापूर भागांतून चिंच विक्रीसाठी येत आहे. नऊ हजार सहाशे ते सतरा हजार नऊशे रुपयांचा दर मिळाला आहे. ज्वारी, गव्हाची काढणी झालेली असल्याने त्यांचीही आवक वाढू लागली आहे. मागील आठवड्यात गव्हाची १४५६ क्विटंलची आवक झाली. गव्हाला १६६१ ते १७०० रुपयांचा दर मिळाला, तर ज्वारीची ३९६ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २२०० रुपयांचा दर मिळाला. तुरीची ११६ रुपयांची आवक होऊन ३९०० रुपयांचा, तर हरभऱ्याची ६२९ क्विंटलची आवक होऊन ३२०० ते ३५०० रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीची २८६ क्विंटलची आवक होऊन ३७८० ते १३५८०, सोयाबीनची ४३ क्विंटलची आवक होऊन ३४०० ते ३५००, गूळडागाची ६४४४ क्विंटलची आवक झाली. गूळडागाला २३३० ते ३५२५० रुपयांचा दर मिळाला. मुगाची ८२ क्विंटलची आवक झाली, मुगाला ४७०० रुपयांचा दर मिळाला. बाजरीची ५२ क्विंटलची आवक होऊन बाजरीला १०५१ रुपयांचा दर मिळाला. नगर बाजार समितीत भुसारची आवक वाढली आहे. चिंचेचा बाजारही चांगला असल्याचे बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे यांनी सांगितले. भाजीपाल्यात बटाटा, वटाणा, टोमॅटो, कोबी, फ्लावरची आवक जास्ती आहे. मात्र मागील सप्ताहाच्या तुलनेत जेमतेम दर आहे. टरबूज, खरबूज, द्राक्षाचीही बाजार समितीत आवक वाढली असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com