agriculture news in Marathi, tamarind rate in Pressure, Maharashtra | Agrowon

चिंचेचे दर दबावात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सरुड, जि. कोल्हापूर : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथील गावकऱ्यांना चिंचेचा हंगाम आतबट्ट्याचा ठरला आहे. चिंच व्यवसायातील मंदी व घसरलेल्या दराचा गावकऱ्यांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. चिंच व्यवसायात गावाची उलाढाल सुमारे २५ लाखांच्या घरात असते. परंतु यंदा हंगाम गोड होण्याऐवजी या व्यवसायास घसरलेल्या दरामुळे त्यास आंबट चव आली आहे. 

सरुड, जि. कोल्हापूर : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथील गावकऱ्यांना चिंचेचा हंगाम आतबट्ट्याचा ठरला आहे. चिंच व्यवसायातील मंदी व घसरलेल्या दराचा गावकऱ्यांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. चिंच व्यवसायात गावाची उलाढाल सुमारे २५ लाखांच्या घरात असते. परंतु यंदा हंगाम गोड होण्याऐवजी या व्यवसायास घसरलेल्या दरामुळे त्यास आंबट चव आली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्‍यातील खुटाळवाडी येथे एकमेव चिंचेचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय जवळपास शंभर-दीडशे वर्षांपासून चालत आला आहे. येथे पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय जोपासला जातोच, पण हा सर्व गावाच्या महिलांवर अवलंबून आहे. गावाला पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे शेतीला पाणी नाही, पर्यायाने शेती कोरडवाहू असल्याने रोजगार नाही, अशी अवस्था लोकांची आहे. असे असल्याने चिंचेसारखा एक वेगळा व्यवसाय या गावाने घरोघरी जोपासून उत्पन्नाचे आणि रोजगाराचे नवे साधन म्हणून विकसित केला आहे. दीड बुट्टी चिंचचे चिंचोके वेगळे करण्यासाठी ३५ रुपये हजेरी अशा बोलीवर रोजगार उपलब्ध करून दिला जातो. एक महिला साधारण १०० ते १५० रुपये हजेरी रोज प्राप्त करते. 

तासगाव, बार्शी व अहमदनगर येथेच चिंचेचा मोठा बाजार आहे. तासगाव येथे खुटाळवाडीची सोललेली चिंच, चिंचोके जातात. बदलत्या हवामानामुळे रंग बदलल्याने यंदा तासगावच्या बाजारात चिंचेचा दर क्विंटलला सुमारे दोन हजार रुपयांनी घसरला आहे. बदललेल्या हवामानामुळे काळपट-लालसर रंग चिंचेला जादा प्राप्त आहे. या रंगाची चिंच टिकण्यासाठी कमी प्रतीची मानली जाते, याचा परिणाम खुटाळवाडीच्या व्यवसायावर झाला आहे. 

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये...
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये...जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर...
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२००...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या...
कोल्हापुरात टोमॅटोच्या दरात वाढकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात मेथी, शेपूचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगाव बाजारात हिरव्या मिरचीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
नाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ४५० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडी येथे भाजीपाल्याची आवक कमी; दर...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत फ्लाॅवर १००० ते २५०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...