agriculture news in marathi, Tamilnadu farmers to challenge PM Modi in election | Agrowon

तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना आव्हान
वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत २०१७ मध्ये १०० दिवस आंदोलन केले. आता ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात १११ शेतकऱ्यांना उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत २०१७ मध्ये १०० दिवस आंदोलन केले. आता ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात १११ शेतकऱ्यांना उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तमिळनाडूतील शेतकऱ्यांचे नेते पी. अय्यकन्नू यांनी शनिवारी (ता. २३) ही माहिती दिली. 'नॅशनल साऊथ इंडियन रिव्हर्स इंटर-लिंकिंग फार्मर्स असोसिएशन' या संघटनेचे अय्यकन्नू हे अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा समावेश भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात करून त्या पूर्ण कराव्यात, या हेतूने उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. शेती उत्पादनांना फायदेशीर किंमत देण्याचीही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी जाहीरनाम्यातून दिले, तर आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेऊ, पण जर तसे झाले नाही, तर मोदींविरुद्ध लढण्याचा आमचा निर्णय कायम राहील, असे ते म्हणाले. या निर्णयाला सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांचा व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वयक समितीचाही पाठिंबा असल्याचे अय्यकन्नू यांनी सांगितले.

"तुमच्या मागण्यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्याची मागणी भाजपकडेच का करीत आहात. कॉंग्रेससह अन्य पक्षांकडे तुम्ही ही मागणी का करीत नाहीत, या प्रश्‍नाला उत्तर देताना अन्नकन्नू म्हणाले, की भाजप अजूनही सत्तेत आहे आणि मोदी पंतप्रधान आहेत. द्रमुक आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमसारख्या पक्षांनी संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेले आहे. आम्ही भाजप किंवा पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही. सत्तेवर येण्यापूर्वी मोदी यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आणि आमचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिले होते. म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी करीत आहोत. भाजप अजूनही असे आश्‍वासन देत नसल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

वाराणसीला जाण्यासाठी ३०० शेतकऱ्यांचे रेल्वेचे तिकीट काढलेले आहे. तिरुवन्नमलाई, तिरुचिरापल्लीसह काही जिल्ह्यांतील शेतकरी वाराणसीला पोचतील. तमिळनाडूतील भाजपचे एकमेव खासदार पॉन राधाकृष्णन यांनी आमच्या मागण्यांदर्भात आश्‍वासनाचा उल्लेख जाहीरनाम्यात करण्याची ग्वाही दिली, तरी निवडणुकीच्या निर्णयावर आम्ही फेरविचार करू.
- पी. अय्यकन्नू, तमिळनाडूतील शेतकरी नेते

इतर अॅग्रो विशेष
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...