agriculture news in marathi, Tanker demand from eighteen villages in Sangli | Agrowon

सांगलीत अठरा गावांतून टॅंकरची मागणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

सांगली ः जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद होत निघाली आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे पाणवठे, विहिरी, कूपनलिका तळाला गेल्या आहेत. तहानलेल्या गावांनी प्रशासनाला टॅंकरने पिण्याचे पाणी पुरवावे, अशी साद घातली आहे. त्यात जत तालुक्‍यातील अठरा गावांतून प्रस्ताव सादर झाले असून आटपाडी, खानापूर तालुक्‍यातून टॅंकरची मागणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

सांगली ः जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद होत निघाली आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे पाणवठे, विहिरी, कूपनलिका तळाला गेल्या आहेत. तहानलेल्या गावांनी प्रशासनाला टॅंकरने पिण्याचे पाणी पुरवावे, अशी साद घातली आहे. त्यात जत तालुक्‍यातील अठरा गावांतून प्रस्ताव सादर झाले असून आटपाडी, खानापूर तालुक्‍यातून टॅंकरची मागणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

पालकमंत्री सुभाष देशमुख यांना या मागणीविषयीची माहिती देण्यात आली असून, परिस्थितीची शहानिशा करून त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या साऱ्या प्रक्रियेत जिल्हा टॅंकरमुक्त झाल्याची घोषणा अडचणीची ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य शासनाकडून पाठ थोपटून घेण्याच्या प्रयत्नात टॅंकरने पाणीपुरवठ्याला खोडा घातला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टेंभू, ताकारा, म्हैसाळ आणि आरफळ या चार उपसा सिंचन योजनांमध्ये तलाव भरून घेतले तरच जिल्ह्यातील गावे टॅंकरमुक्त होतात, हे वास्तव आहे. जलयुक्त शिवारसारख्या योजनेचे ते यश असल्याचे कितीही ढोल पिटले तरी तो दावा पोकळ असल्याचे समोर आले आहे.

यंदा उपसा सिंचन योजनेतून १०५ गावांतील तलाव भरून घ्यावेत, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. पैकी टेंभू, ताकारी योजनांतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. म्हैसाळ योजनेचा वीजपुरवठा जोडला असला तरी पाण्याची मागणीच नाही, या तांत्रिक कारणास्तव योजना सुरू करण्यात आलेली नाही. त्यातून तलाव भरून घेतले तर बहुतांश गावांतील टॅंकरची मागणी कमी होईल, असे सांगितले जाते. तोवर टॅंकर द्यावेत, अशी मागणी येऊ लागली आहे.

इतर बातम्या
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
यंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक :...सोलापूर  ः यंदा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...