सोलापूर जिल्ह्यात टँकरचा आकडा सव्वाशेवर

टँकरचा आकडा सव्वाशेवर
टँकरचा आकडा सव्वाशेवर

सोलापूर  : जिल्ह्यात उन्हाच्या वाढत्या तडाख्याने टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत शंभरापर्यंत पोचलेली पाण्याच्या टँकरची संख्या आता १२७ वर पोचली आहे. त्यामुळे येत्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

पंढरपूरवगळता अन्य सर्व तालुक्यांत पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक ४७ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. रोज त्यात भरच पडते आहे. त्यामुळे एकीकडे ऊन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे पाण्यासाठी वणवण, अशी स्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. १२७ टँकरमार्फत १२९ गावे आणि ९५४ वाड्यांना पाणीपुरवठा होतो आहे. त्याशिवाय जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत ३ ८ विहिरींचे अधिगृहणही करण्यात आले आहे. 

मंगळवेढा, करमाळा, दक्षिण सोलापूर व सांगोला तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. या भागात तब्बल सव्वालाख लोकांना पाणीपुरवठा होतो आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतूनही आणखी ९० टँकरची मागणी होते आहे. लवकरच ही संख्या ४०० ते ५०० टँकरपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय सध्या सुरू टँकर

मंगळवेढा ४४
सांगोला २४
माढा  
करमाळा १९
मोहोळ
उत्तर सोलापूर
अक्कलकोट
बार्शी
दक्षिण सोलापूर ११
माळशिरस   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com