खेड, हवेलीत मागणीनुसार टॅंकर सुरू करावेत

खेड, हवेलीत मागणीनुसार टॅंकर सुरू करावेत
खेड, हवेलीत मागणीनुसार टॅंकर सुरू करावेत

पुणे : खेड आणि हवेली तालुक्‍यातील पाणी आणि चाराटंचाईबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांनी विशेष बैठक घेतली. तालुक्यातील समस्या आणि अडचणी समजावून घेऊन त्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, तसेच दोन्ही तालुक्यात टॅंकरची मागणी होत असून, त्या ठिकाणी टॅंकर सुरू करून पाणी पुरवठा करण्याच्या सूचना अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिले आहेत. 

खेड तालुक्यात सध्य स्थितीत एकही टॅंकर सुरू नसून, नुकतीच ३ टॅंकरची मागणी करण्यात आली आहे. तर हवेली तालुक्यातूनही एका टॅंकरची मागणी होत आहे. मागणी करण्यात आलेल्या ठिकाणी तत्काळ टॅंकर मंजूर करावेत, अशा सूचना देवकाते यांनी दिल्या आहेत. दोन्ही तालुक्‍यांमधील नवीन विंधन विहीर घेणे, प्रस्तावित नळ योजनांची विशेष दुरुस्ती, प्रस्तावित विंधन विहिरीची दुरुस्ती, टॅंकरने किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे या योजनांचा आढावा घेण्यात आला. नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीची कामे निविदास्तरावर असून मार्चअखेर सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टंचाईअंतर्गत खेड तालुक्‍यातील ३१ गावे आणि २९५ वाड्या-वस्त्यांमध्ये एकूण ३२६ उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ कोटी २१ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला, तर हवेली तालुक्यातील ५० गावे १६० वाड्या-वस्त्यांमधील २१० उपाययोजनांसाठी १ कोटी १२ लाख रुपयांचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे. खेड आणि हवेली तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधी  आणि अधिकाऱ्यांनी टंचाई   निवारणासाठी उपाययोजना सुचवाव्यात. पुरवणी आराखड्यात त्यांचा समावेश करण्यात येईल, असे देवकाते यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com