agriculture news in Marathi, Tanker water supply in the orange garden during the famine | Agrowon

दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या पाण्याचा आधार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर वेढले आहे. शेतांमध्ये उभ्या असलेल्या फळबागांसाठी उगवणारा दिवस अडचणीचा ठरू लागला असून, आता अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी या बागा कशा जगवाव्यात, असा पेच पडला आहे. काही शेतकरी मिळेल त्या साधनांचा व पर्यायाचा विचार करून बागा जगविण्याची धडपड करू लागले आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी संत्र्यासारखे प्रमुख पीक असून, ते जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.

अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर वेढले आहे. शेतांमध्ये उभ्या असलेल्या फळबागांसाठी उगवणारा दिवस अडचणीचा ठरू लागला असून, आता अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी या बागा कशा जगवाव्यात, असा पेच पडला आहे. काही शेतकरी मिळेल त्या साधनांचा व पर्यायाचा विचार करून बागा जगविण्याची धडपड करू लागले आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी संत्र्यासारखे प्रमुख पीक असून, ते जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.

अकोट तालुक्यातील अनेकांनी फळबागा तोडण्याचे काम हातात घेतले. काही शेतकऱ्यांनी फळबागा वाचविण्यासाठी खर्च करण्याची मानसिकता केली आहे. बोर्डी गावातील विशाल भालतिलक या युवा शेतकऱ्याकडे आठ एकरांत फळबाग आहे. त्यात चार एकर डाळिंब व चार एकरांत संत्रा आहे. आतापर्यंत बोअरवेलचे पाणी बागेसाठी पुरेशे होते. मात्र, सद्यःस्थितीत हे पाणी अपुरे ठरल्याने बागेसाठी पाचशे रुपये रोजाने टँकर भाड्याने आणले. स्वतःच्या ट्रॅक्टरला टँकर लावून दुसऱ्या शेतकऱ्याकडून पाणी आणून तीन मजुरांच्या साह्याने बागेला पाणी देत आहे. फळबागेचा विमा काढलेला आहे. अद्याप कुठलीही मदत त्याद्वारे झालेली नाही. पाणीच शिल्लक न राहल्याने दोन एकरांतील संत्रा बाग तशीच सोडून दिली असून, दोन एकरांतील झाडे वाचविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे विशाल भालतिलक यांनी सांगितले.  

शासकीय मदतीची आस
अकोट तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन आता चार महिने लोटली. मात्र, या काळात दुष्काळी मदत कुठलीही हातात पडली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशाल भालतिलक यांच्या कुटुंबाला एकही रुपयाची दुष्काळी मदत झालेली नाही. सोबतच नुकसान होत असताना कुठला शासकीय अधिकारीही बांधापर्यंत पोचलेला नसल्याची खंत विशाल याने बोलून दाखवली.

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...