agriculture news in marathi, Tankers in the district will move to the hundreds | Agrowon

नाशिक जिल्ह्यात टँकर्सची शंभरीकडे वाटचाल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

नाशिक : मुंबईमध्ये माॅन्सूनचे आगमन झाले असले तरी नाशिककरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रहिवाशांना अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील आणखी १९ गावे आणि ७५ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने १८ टँकर्सला मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची तहान भागविण्यासाठी धावणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ झाली असून शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.

नाशिक : मुंबईमध्ये माॅन्सूनचे आगमन झाले असले तरी नाशिककरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रहिवाशांना अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील आणखी १९ गावे आणि ७५ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने १८ टँकर्सला मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची तहान भागविण्यासाठी धावणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ झाली असून शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.

जिल्हावासीयांनी यंदा तप्त उन्हाच्या झळांचा सामना केला. उन्हाची दाहकता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचे उपलब्ध स्राेतही आटू लागले आहेत. पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थांकडून जिल्हा प्रशासनाकडे टँकर्सची मागणी होऊ लागली. ७७ टँकरद्वारे २६८ गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा सुरू होता. आणखी ९२ गावे आणि वाड्यांसाठी १८ टँकर्सला प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची तहान भागविणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ होणार आहे.
बागलाण, येवल्यात सर्वाधिक झळ

येवला, बागलाण आणि सिन्नर तालुक्यात टंचाईची सर्वाधिक झळ सहन करावी लागत आहे. या तीन तालुक्यांमध्ये ५२ टँकर सुरू असून आणखी दोन टँकरला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मालेगाव व नांदगावमध्ये देखील प्रत्येकी नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १०३ गावे आणि १६५ वाड्यांसाठी ७७ टँकर्सद्वारे दररोजच्या २५७ फेऱ्या होत आहेत. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या गावांसाठी दोन दिवसांत १८ टँकर सुरू होणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

 

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...