agriculture news in marathi, tankers reached to 65 in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात टँकरने गाठली पासष्टी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

नाशिक : ऑक्टोबरअखेर जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून, सहा तालुक्यांमधील २६१ गावे व वाड्यांना ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरसाठीचे तीन नवीन प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. त्यामुळे टँकरची एकूण संख्या ६८ वर पोचणार आहे.

नाशिक : ऑक्टोबरअखेर जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून, सहा तालुक्यांमधील २६१ गावे व वाड्यांना ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरसाठीचे तीन नवीन प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. त्यामुळे टँकरची एकूण संख्या ६८ वर पोचणार आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. पंधरापैकी दहा तालुक्यांमध्ये सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला असून, यातील आठ तालुक्यांमध्ये सरकारने यापूर्वीच टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस विविध तालुक्यांमधील भूजल पातळीत घट होत आहे. परिणामी, टंचाईत भर पडत आहे. सद्यःस्थितीत पाच तालुक्यांमधील ५८ गावे आणि २०३ वाड्या-वस्त्यांना ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक १७ टँकर एकट्या सिन्नर तालुक्यात सुरू आहेत. ११ गावे आणि ९३ वाड्या-वस्त्यांना हे टँकर पाणीपुरवठा करीत आहेत. येवल्यातील ४२ गावे-वाड्यांना १५ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.

टंचाईची दाहकता विचारात घेता टँकरच्या १७८ फेऱ्या प्रशासनाने मंजूर केल्या असून, प्रत्यक्षात १६२ फेऱ्या दिवसाला होत आहेत. तसेच एकूण २६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यातील १९ विहिरी गावांसाठी, तर उर्वरित सात विहिरी या टँकरसाठी राखीव आहेत.

जिल्हा प्रशासनाकडे टँकरसाठीचे तीन प्रस्ताव नव्याने सादर झाले आहेत. यामध्ये मालेगाव, चांदवड आणि बागलाण तालुक्यांकडून प्रत्येकी एक प्रस्ताव आले आहेत. दरम्यान, प्रशासनाने हे प्रस्ताव जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठविल्याने टँकरची संख्या ६८ वर पोचणार आहे. दरम्यान, आगामी महिन्यात या संख्येत अधिक वाढ होण्याची चिन्हे आहेत.

इतर बातम्या
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
`महानंद'मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरूमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ अर्थात...
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही...कोल्हापूर : उर्वरित एफआरपीबाबत साखरेची मागणी...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
उसाला प्रतिटन २०० ते २२५ अनुदान मिळणार...नवी दिल्ली : साखर कारखान्यांन्या साखरेच्या...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
संत्रा, मोसंबी नुकसानीचा अहवाल द्या ः...नागपूर ः संत्रा, मोसंबी पिकांचा बहुवार्षिक पिकात...
शाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर...सौर कृषिपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच...