agriculture news in marathi, tanks to build in rocky area, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भागात बांधणार खडकातील टाक्या
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018
दुर्गम, डोंगराळ भागातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी खडकातील टाक्या बांधण्यात येणार आहेत. यासाठी अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच याबाबत प्रस्ताव मागवून टाक्यांचे नियोजन करण्यात येईल.
- सुरेंद्रकुमार कदम, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा.
पुणे  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील दुर्गम डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी, यासाठी शिवकालीन टाक्यांप्रमाणे खडकातील टाक्या बांधण्याची नवीन्यपूर्ण योजना जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. या टाक्यांसाठी अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
 
‘सह्याद्री’च्या पूर्वउतारावर असलेल्या दुर्गम, डोंगराळ भागात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. या भागात उतार अधिक असल्याने हे पाणी साठून न राहता वेगाने वाहून जाते. त्यामुळे पाण्याअभावी तेथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर टंचाईला तोंड द्यावे लागते. उंचावर असलेल्या या भागात टॅंकरने पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठ्यासाठी उपसा योजना करणे शक्य होत नाही. परिणामी, रहिवाश्‍ाांना पिण्याच्या पाण्यासाठी दूर अंतरापर्यंत पायपीट करावी लागते.
 
यापर्वी काही भागांत अशा टाक्या खोदल्याने पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटला आहे. जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समितीनेही नुकतीच भाेर आणि वेल्हा तालुक्यातील काही गावांत खडकांच्या टाक्यांसाठी एक कोटी ७५ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
 
अाता जुन्नर, अांबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्याच्या पश्‍चिमेकडील डोंगरावर असलेल्या अनेक वाड्यावस्त्यांना पाण्याची सातत्याने भासणारी टंचाई कायमची दूर करण्यासाठी खडकातील पाण्याच्या प्रवाहांचा शोध घेऊन तेथे टाक्या खोदण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...