agriculture news in marathi, Target of cultivation of 23 lakhs seedlings in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात २३ लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

सातारा  : जिल्ह्यासाठी १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत २३ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. ही वृक्ष लागवड १ ते ३१ जुलै या दरम्यान करावयाची आहे. वृक्षलागवडीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिल्या.

सातारा  : जिल्ह्यासाठी १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत २३ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. ही वृक्ष लागवड १ ते ३१ जुलै या दरम्यान करावयाची आहे. वृक्षलागवडीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बुधवारी (ता.२०) १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी सिंघल बोलत होत्या. या वेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते.

श्रीमती सिंघल म्हणाल्या, की महाराष्ट्र हरित सेना हा उपक्रम वन विभागाने सुरू केला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील ७५ हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. हरित सेनेमध्ये आणखी नोंदणी कशी वाढेल यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकर घ्यावा. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर १ ते ३१ जुलै या दरम्यान फळबाग लागवडीचे नियोजन करावे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावात व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे झालेल्या गावांमध्ये वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम घ्यावा. वृक्ष लागवडीसाठी प्रत्येक विभागाने लागवडीचे नियोजन करावे. कार्यक्रमामध्ये गावातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजुला वृक्षांची लागवड करावयाची आहे. या वृक्षांच्या संवर्धनासाठी उपाय योजना कराव्यात.

विद्यार्थ्यांच्या सहली
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सीसीटीची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांवर शाळेच्या सहलींचे नियोजन करून सीसीटीमध्ये विद्यार्थ्यांकडून बियाणे टाकून घ्यावीत. तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबतची या वेळी माहिती द्यावी, अशी सूचनाही श्वेता सिंघल यांनी दिली.

 

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...