तंत्रज्ञान शेतकरी स्नेही व्हायला हवे ः ढवण

तंत्रज्ञान शेतकरी स्नेही व्हायला हवे ः ढवण
तंत्रज्ञान शेतकरी स्नेही व्हायला हवे ः ढवण

औरंगाबाद : शेतीतील प्रश्न संपत नाहीत, कालपरत्वे त्यांचे स्वरूप बदलत असते. त्यामुळे निर्माण झालेल्या- होणाऱ्या प्रश्नांची उत्तर प्रामाणिकपणे शोधण्याची आवश्‍यकता आहे. तंत्रज्ञान केवळ विकसित होऊन भागत नाही. ते शेतकरी स्नेही व्हायला हवे. त्यासाठी निर्मित तंत्रज्ञानाची सातत्याने उजळणी व्हावी, त्यामधील अडचणी समजून घ्यायला हव्या, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची (झेडआरईएसी, रब्बी) रब्बी हंगामपूर्व ६४ वी बैठक सोमवारी (ता. २४) औरंगाबादेत पार पडली. या बैठकीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या बैठकीला वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण विस्तार संचालक डॉ. पी. जी. इंगोले, संचालक कृषी शिक्षण  डॉ. व्ही. डी. पाटील, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी डी. जी. मुळे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख व सहयोगी संचालक डॉ. एस. बी. पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यंदा अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या चिंतेचे वातावरण या बैठकीवर स्पष्टपणे जाणवले. बैठकीत मांडल्या गेलेल्या प्रत्याभरणानेही ही बाब अधोरे.िखत केली. प्रास्ताविक डॉ. एस. बी पवार यांनी केले. उद्‌घाटनपर मार्गदर्शनात कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी मराठवाड्यातील शेतीची स्थिती, त्यासमोर आव्हाने, संकट आदींवर प्रकाश टाकला.

डॉ. ढवण म्हणाले, की बोंड अळी नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व प्रशासनाने केलेले एकत्रित प्रयत्न कामी आल्याने बोंड अळी नियंत्रणात आली. तंत्रज्ञानाच्या निर्मिती व विस्तारात, शेतकऱ्यांनी ते स्वीकारण्यात आपण मागे नाही. परंतु त्यानंतर तूर, हरभऱ्याचे अनुभव पाहता आता शेतकऱ्यांपुढे कोणते पीक घेऊन जावे, हा प्रश्न आव्हान बनून समोर उभा आहे. बाजारपेठा शेतकरी स्नेही नाहीत. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात उत्पादकता वाढविण्यावर लक्ष कें.िद्रत न करता उत्पादन खर्च कमी करणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. संचालन व आभार डॉ. एस. आर. जक्‍कावाड यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com