agriculture news in marathi, Tehsil officer dismissed regarding Farmer suicide case | Agrowon

शेतकरी आत्महत्या मदतप्रकरणी तहसीलदार निलंबित
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 नोव्हेंबर 2017

हिंगोली : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या अर्जाचे गांभीर्य विचारात घेऊन तत्काळ कार्यवाही करणे अपेक्षित असताना तहसीलदारांनी १० दिवस विलंबाने कार्यवाही केली. याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

हिंगोली : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या अर्जाचे गांभीर्य विचारात घेऊन तत्काळ कार्यवाही करणे अपेक्षित असताना तहसीलदारांनी १० दिवस विलंबाने कार्यवाही केली. याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

हिंगोली तालुक्यातील शेतकरी वामन जाधव यांनी २०१५ मध्ये आत्महत्या केली होती. जाधव यांच्या वारसास शासनाकडून ३१ हजार रुपये रोख आणि ६९ हजार रुपये मुदत ठेवीच्या स्वरूपात याप्रमाणे आर्थिक मदत करण्यात आली. जाधव यांचा मुलगा संजय जाधव यांनी त्यांच्या आईच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुदत ठेवीमधून रक्कम देण्याची मागणी अर्जाद्वारे ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी तहसीलदार गजानन शिंदे यांच्याकडे केली होती. या अर्जावर दहा दिवस काहीही कार्यवाही केली नाही. आईच्या उपचारासाठी रक्कम मिळत नसल्यामुळे ९ नोव्हेंबर २०१७ रोजी संजय जाधव यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान संजय जाधव यांचा १० नोव्हेंबररोजी मृत्यू झाला. तहसीलदार शिंदे यानी ९ नोव्हेंबर रोजी अर्जातील त्रुटीच्या अनुषंगाने पूर्तता करण्याचे पत्र अर्जदारास निर्गमित केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या अर्जाचा गांभीर्याने विचारात घेऊन तत्काळ कार्यवाही करणे अपेक्षित असताना १० दिवस विलंबाने कार्यवाही केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त यांनी शुक्रवारी (ता.२३)  तहसीलदार गजानन शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

इतर ताज्या घडामोडी
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...
कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी...नाणार  : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार...
रणरणत्या उन्हातील धान्य महोत्सवाकडे...नागपूर  ः विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाख टन खते उपलब्ध...पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली...
अकोला जिल्ह्यात १०३२ शेततळ्यांची कामे... अकोला ः पीकउत्पादन वाढीसाठी शाश्वत पाणीस्रोत...
मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या... औरंगाबाद  : गत आठवड्याच्या तुलनेत...
परभणीत‘शेतमाल तारण योजने अंतर्गत ४०... परभणी  ः परभणी कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा नगर ः जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या...
परभणीत खरिपात सोयाबीन, मूग, तुरीचे... परभणी  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगरमधील २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना... नगर ः राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर...
नाशिक विभागातील ११०० गावांची "जलयुक्त... नाशिक : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी...
सार कसं सामसूम तरंग नाही तलावात...शेती कोरडवाहू. तरीही स्वबळावर दुग्ध व्यवसायातून...
बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ‘पॉक्‍सो’ कायद्यात...
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...