तेलंगणा विधानसभा मुदतीआधीच होणार बरखास्त; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

तेलंगणा विधानसभा मुदतीआधीच होणार बरखास्त; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

हैदराबाद : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज (ता. 6) तेलंगणा विधानसभा मुदतीआधी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला असून राव हे राज्यपाल ईएसएल नरसिंहम यांची भेट घेऊन त्यांना बरखास्तीच्या निर्णयाची माहिती देतील.  मुख्यमंत्री राव यांनी आज मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली होती. यापूर्वीच विधानसभा मुदतीआधी बरखास्त करण्याचा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात होती. या बैठकीत राव यांनी मुदतपूर्व विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला व सर्वानुमते तो मंजूर करण्यात आला. 

तेलंगणा राज्यात तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे सरकार आहे. या सरकारचा कार्यकाळ मे 2019 पर्यंत आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांचा व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा परिणाम तेलंगणा विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतो, अशी शक्यता राव यांनी व्यक्त केली. यामुळे मुदतपूर्व विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय राव यांनी घेतला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com