Agriculture News in Marathi, Telangana government had waived farmers loan, said Chief Minister K Chandrashekhar Rao | Agrowon

तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचे १६ हजार कोटींचे कर्ज माफ
वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017
हैदराबाद ः तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांनी विविध बॅंकांमधून घेतलेले १६ हजार कोटींचे कर्ज माफ केले अाहे. कर्जमाफीमुळे राज्यातील सुमारे ३५.२९ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला अाहे. एकही शेतकरी कर्जमाफी योजनेतून चुकलेला नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्य विधानसभेत दिली.
 
हैदराबाद ः तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांनी विविध बॅंकांमधून घेतलेले १६ हजार कोटींचे कर्ज माफ केले अाहे. कर्जमाफीमुळे राज्यातील सुमारे ३५.२९ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला अाहे. एकही शेतकरी कर्जमाफी योजनेतून चुकलेला नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्य विधानसभेत दिली.
 
कर्जमाफीसंदर्भात राज्य विधानसभेत झालेल्या चर्चेवेळी मुख्यमंत्री राव यांनी बुधवारी (ता. १) ही माहिती दिली. देशातील कोणत्याही राज्याने अाजपर्यंत सर्व प्रकारच्या बॅंकांमधून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ केलेले नाही; मात्र तेलंगणा असे एकमेव राज्य सरकार अाहे, ज्याने सर्व बॅंकांमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले अाहे, असा दावा मुख्यमंत्री राव यांनी केला अाहे.
 
सहकारी सोसायट्या, राष्ट्रीयीकृत बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बॅंका अाणि इतर बॅंकांमधून शेतकऱ्यांनी घेतलेले १६ हजार कोटी रुपयांचे कर्ज चार हप्त्यांत माफ करण्यात अाले अाहे. तसेच शेतकरीहिताच्या दृष्टीने शेतमालास हमीभाव दिला जात अाहे. शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न अाहेत, ते सोडविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अाहे. कोणताही शेतकरी जर कर्जमाफीपासून वंचित राहिला असल्याचे निदर्शनास अाणून द्या, त्याचे कर्जमाफ केले जाईल, असेही अावाहन त्यांनी विधानसभेतील सदस्यांना केले. 
 
दरम्यान, बोगस बियाणेप्रकरणी सरकारने गंभीर दखल घेतली अाहे. बोगस बियाणेप्रकरणी अातापर्यंत सात लोकांना अटक करण्यात अाली अाहे. येत्या हिवाळी अधिवेशनात बोगस बियाण्यांवर प्रतिबंध घालण्याकरिता राज्य सरकारकडून अध्यादेश काढला जाईल, असे अाश्वासन मुख्यमंत्री राव यांनी दिले.
 
कर्जमाफी योजनेवर काँग्रेसचा अाक्षेप
सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ केल्याच्या राज्य सरकारच्या दाव्यावर तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीने अाक्षेप घेतला अाहे. राज्य सरकारने केवळ कर्जाची मूळ रक्कम माफ केली असून, शेतकरी सध्या कर्जावरील व्याज भरत अाहेत, असे प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अाणि काँग्रेसचे अामदार उत्तम कुमार रेड्डी यांनी राज्य सरकारच्या निर्दशनास अाणून दिले. कर्जमाफीसंदर्भात अापण अाठवडाभरात अहवाल सादर करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री राव यांनी, अहवाल सादर झाल्यानंतर त्याची शहानिशा करून रक्कम मंजूर केली जाणार असल्याचे अाश्वासन दिले.
 
कापूस, भात खरेदीसाठी राज्यात केंद्रे
कापूस अाणि भात खरेदीसाठी राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात अाल्या अाहेत. राज्यात सर्व ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात अाली अाहे. राज्यात यंदा ४८ लाख एकरवर कापूस लागवड झाली असून, ३० लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित अाहे. सध्या एक लाख टनांपेक्षा कमी कापसाची बाजार समित्यांमध्ये अावक झाली, अशी माहिती देण्यात अाली.
 
कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या तेलंगणामधील ३५.२९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे दिलासा मिळाला अाहे. एकही शेतकरी कर्जमाफी योजनेतून चुकलेला नाही. देशातील कोणत्याही राज्याने अाजपर्यंत सर्व प्रकारच्या बॅंकांमधून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ केलेले नाही; मात्र तेलंगणा असे एकमेव राज्य सरकार अाहे, ज्याने सर्व बॅंकांमधील शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले अाहे.
-के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा 

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...