तेलंगणात शेतकऱ्यांना देणार अर्ध्या किमतीत दुभत्या म्हशी

तेलंगणात शेतकऱ्यांना देणार अर्ध्या किमतीत दुभत्या म्हशी
तेलंगणात शेतकऱ्यांना देणार अर्ध्या किमतीत दुभत्या म्हशी

हैदराबाद : दूध उत्पादनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना तेलंगण सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना म्हशींच्या खरेदीसाठी ५० टक्के अंशदान देण्यात येईल, या प्रकल्पावर आठशे कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती राज्याचे पशुकल्याण मंत्री तलास्नी श्रीनिवास यादव यांनी येथे दिली.  पत्रकार परिषदेत मंत्री यादव शुक्रवारी (ता.९) बोलत होते. ते म्हणाले, की या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख म्हशी दिल्या जाणार असून, त्यासाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्य सरकारनेच या योजनेचे नियोजन आखले आहे. शेतकरी दूध उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच राज्य सरकार नियोजन आखत असून याआधी मेंढ्यांच्या वितरणातून आम्ही हे केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ऐंशी हजाराची म्हैस खरेदी करण्यासाठी केवळ चाळीस हजार रुपये द्यावे लागणार असून उर्वरित रक्कम ही त्यांच्या वतीने राज्य शासन भरणार आहे. यासाठी दरवर्षी शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार असून शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर चार रुपये प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. शेतकऱ्यांना त्यांचे दूध सरकारी डेअऱ्यांना पुरविता यावे म्हणून राज्य सरकार प्रोत्साहनपर भत्ता देईल. मांस प्रक्रिया प्रकल्प  शहराच्या बाहेर दोनशे एकरावर मांस प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार असून, यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ८० कोटी रुपयांचे मत्स्यबीजदेखील मोफत देण्यात येईल. यासाठी राज्यातील ४६ हजार तळ्यांची पाहणी करण्यात आली आहे. "काकतीय'' मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांना ५० हजार दुचाकी वाहने, दोन हजार तीन चाकी आणि अन्य साहित्यदेखील दिले जाणार असून त्याच्या माशांच्या विक्रीसाठी ७५ टक्के अंशदान देण्यात येईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com