राज्यातील तापमानात आणखी घट...!

राज्यातील तापमानात आणखी घट...!
राज्यातील तापमानात आणखी घट...!

पुणे :  ढगांच्या अाच्छादनाबरोबरच पूर्वमाेसमी पावसाची जोरदार हजेरी, माॅन्सूनचे आगमन यामुळे राज्याच्या तापमानात मोठी घट झाली आहे. आठवड्याच्या सुरवातीला चाळीशीवर असलेला पारा वेगाने खाली उतरून ३५ अंशापेक्षाही खाली उतरला आहे. दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा तब्बल ४ ते ८ अंशांची मोठी घट झाल्याने दिवस थंड झाले आहेत. तर रात्रीचे तापमानाही सरासरीच्या २ ते ४ अंशांनी घटल्याने रात्री गारठा वाढू लागला आहे. रविवारी (ता.१०) सकाळर्पंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे उंच्चांकी ३९.२ तर महाबळेश्‍वर येथे निचांकी १८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली आहे.  यंदा उन्हाळ्यात उन्हाचा चटका वाढून अनेक ठिकाणी तापमान ४३ अशांच्या वर नोंदले गेले होते. विदर्भात तर पारा ४५ अशांच्या पुढे पोचला होता. चंद्रपूर येथे हंगामातील उच्चांकी ४७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, जून महिना सुरू होताच राज्याभर पूर्वमोसमी पावसाने जोर धरला. दिवसाचे तापमानात घट होण्यास सुरवात झाली. शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झालेल्या मॉन्सूनने शनिवारी राज्याचा निम्मा भाग व्यापला. त्यामुळे सकाळपासूनच ढगाळ हवामान तयार होत असल्याने कमाल तापमानात घट झाली आहे.   विदर्भात कमाल तापमानात सुमारे ५ ते ८ अंशांची घट होत कमाल तापमानाचा पारा ३२ ते ३६ अंशांपर्यंत खाली आला आहे. यवतमाळ येथे तापमानात सर्वाधिक ७.९ अंशांची घट होत ३१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी तापमानात ६ ते ७ अंशांची घट हसून, तेथे तापमान ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही तापमानात २ ते ७ अंशांची घट होत पारा २७ ते ३० अंशांवर आहे. तर कोकणात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांची घट होत २६ ते २९ अंशांच्या जवळपास तापमान नोंदले जात आहे.  रविवारी (ता. १०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.०, जळगाव ३८.४, कोल्हापूर २७.४, महाबळेश्वर २०.८, मालेगाव ३९.२, नाशिक ३३.५, सांगली २८.३, सातारा २९.५, सोलापूर ३०.३, मुंबई २८.२, अलिबाग २७.७, रत्नागिरी २८.०, डहाणू ३५.०, आैरंगाबाद ३५.४, परभणी ३३.५, नांदेड ३२.५, उस्मानाबाद २९.६, अकोला ३५.४, अमरावती ३२.८, बुलडाणा ३६.०, ब्रह्मपुरी ३३.३, चंद्रपूर  ३४.६, गोंदिया ३४.०, नागपूर ३५.३, वर्धा ३४.०, यवतमाळ ३१.५.   

राज्यातील हवामान विभागांचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
विभाग कमाल किमान
कोकण २६ ते २९ २३ ते २५
मध्य महाराष्ट्र २७ ते ३० २१ ते २७
मराठवाडा ३० ते ३५ २० ते २३
विदर्भ ३२ ते ३६ २१ ते २५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com