तापमानात वाढ; पारा ३० अंशांवर

तापमानात वाढ; पारा ३० अंशांवर
तापमानात वाढ; पारा ३० अंशांवर

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात अंशत: ढगाळ आकाश असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पारा ३० अंशांवर पोचला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोकणात आज (ता.२) तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.   राज्यात पाऊस थांबल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दिवसाचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. तर, ढगाळ हवामानामुळे विदर्भात मात्र पारा सरासरीच्या खाली आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाडाही जाणवत आहे.  मध्य महाराष्ट्र आणि कोकणात किमान तापमानही सरासरीच्या वर गेले असल्याने रात्रीही उकाडा जाणवू लागला आहे. नगर, जळगाव, सोलापूर, सांताक्रुज, अलिबाग, डहाणू, परभणी, नांदेड, वर्धा येथे ३० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे.  माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत स.िक्रय आहे. उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, उत्तर प्रदेश आणि ओडिशा परिसरावरील चक्राकार वारे, विषवृत्ताच्या दक्षिणेकडून येणाऱ्या मॉन्सून प्रवाहाचा मंदावलेला वेग यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पाऊस ओसरला आहे. बुधवारपर्यंत (ता. ५) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला अाहे.   शनिवारी (ता.१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.६, नगर ३३.०, जळगाव ३०.८, कोल्हापूर २७.८, महाबळेश्वर १९.२, मालेगाव २९.८, नाशिक २८.४, सांगली २९.६, सातारा २७.८, सोलापूर ३२.७, सांताक्रूझ ३०.६, अलिबाग ३१.२, रत्नागिरी २९.७, डहाणू ३१.१, आैरंगाबाद २९.५, परभणी ३०.१, नांदेड ३०.१, अकोला २८.६, अमरावती २६.०, बुलडाणा २६.२, चंद्रपूर २८.२, गोंदिया २८.५, नागपूर २८.१, वर्धा ३०.९, यवतमाळ २६.५. 

शनिवारी (ता.१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - कृषी विभाग) :  कोकण : तळा ३०, दापोली ३६, बुरोंडी ३७, दाभोळ ४९, अंजर्ला ३८, पालगड ४१, वेळवी ४०, भरणे ३६, पाचल ३०, अंबोली ३५.  मध्य महाराष्ट्र : महाबळेश्‍वर ४७, तापोळा ७४, लामज ८७, आंबा ३२, चंदगड २१. मराठवाडा : अदमपूर २०, उस्माननगर २२, कापसी २९, मांडवी २०, धर्माबाद २९.  विदर्भ : रत्नारा ५४, दासगाव ७०, रावणवाडी ६७, कामठा ६०, काट्टीपूर ७२, कवरबांध ३०, सालकेसा ३०, पेरमिली ३८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com