agriculture news in marathi, temperature increased in state, Maharashtra | Agrowon

राज्यात उन्हाचा चटका वाढला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पुणे : राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून उर्वरीत राज्यात तुरळक पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला अाहे.
 

पुणे : राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून उर्वरीत राज्यात तुरळक पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला अाहे.
 
राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. विदर्भात ढगाळ हवामान, पावसामुळे घसरलेला पारा पुन्हा पुन्हा वर सरकला आहे. बहुतांशी ठिकाणी तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. सोलापूर, अकोला, चंद्रपूर येथे तापमान ३३ अंशाच्या वर गेले आहे. तर जळगाव, परभणी, वर्धा येथे ३२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. रात्रीच्या किमान तापमान सरासरीच्या खाली असले तरी त्यात वाढ झाली आहे. 

मॉन्सूनला जोर राहिला नसल्याने राज्यात पाऊस थांबला आहे. रविवारी सकाळपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरीत राज्यात कोरडे व अंशत: ढगाळ हवामान होते. पावसाला पोषक हवामान नसल्याने पावसाची उघडीप कायम राहणार आहे. आज (ता. १०) मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी एखाद दुसरी पावसाची सर पडण्याचा अंदाज आहे. तापमानात १ ते २ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

रविवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.३ (१८.६), जळगाव ३२.६ (२०.४), कोल्हापूर २८.९(१९.५), महाबळेश्‍वर १९.०(१५.२), मालेगाव ३१.०(२१.४), नाशिक २७.५(१९.५), सांगली ३०.०(१८.१), सातारा २८.१(१९.५), सोलापूर ३३.० (२०.१), सांताक्रुझ ३१.१(२३.९), अलिबाग ३१.७(२४.३), रत्नागिरी २९.३(२२.७), डहाणू ३०.३(२५.४), आैरंगाबाद ३०.७ (१८.६), परभणी ३२.३(१९.५), नांदेड ३०.०(२२.०), अकोला ३२.४२(२०.०), अमरावती ३०.८(१९.४), बुलडाणा २९.२ (१८.८), चंद्रपूर ३३.६ (२१.४), गोंदिया ३०.०(२२.५), नागपूर ३१.४(२०.३), वर्धा ३२.०(१९.९).

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...