राज्याच्या तापमानात वाढ

राज्याच्या तापमानात वाढ
राज्याच्या तापमानात वाढ

पुणे : राज्यात हवामान निरभ्र आणि कोरडे होत असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान सरासरीवर गेले अाहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील भिरा येथे तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीपार गेल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. बुधवारी (ता.२१) विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  मागील अाठवड्यात राज्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सरासरीच्या खाली उतरलेले कमाल तापमान पुन्हा वाढू लागले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक प्रमुख शहरांचे तापमान ३५ ते ३६ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. यंदाच्या हंगामात भिरा येथे उच्चांकी ४२ अंशांची नोंद झाल्यानंतर मागील आठवड्यात तेथील तापमान ३१ अंशांपर्यत घसरले होते. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे उच्चांकी ४०.३ अंशांची नोंद झाली. सोमवारी दुपारनंतर उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला, तर विदर्भ अाणि परिसरावर असलेले चक्राकार वारे, उत्तर ओडिशापासून कर्नाटकपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ मराठवाड्यात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ हवामान होते. विदर्भात बुधवारी (ता.२१) ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात अकाश मुख्यत: निरभ्र राहून तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.६, नगर ३७.०, जळगाव ३८.६, कोल्हापूर ३४.९, महाबळेश्वर ३१.६, मालेगाव ३७.०, नाशिक ३४.५, सांगली ३६.४, सातारा ३६.२, सोलापूर ३८.७, मुंबई ३२.०, अलिबाग ३२.५, रत्नागिरी ३३.४, डहाणू ३१.२, भिरा ४०.३, औरंगाबाद ३५.५, परभणी ३७.९, नांदेड ३८.०, अकोला ३८.३, अमरावती ३७.२, बुलडाणा ३७.०, ब्रह्मपुरी ३८.३, चंद्रपूर ३७.८, गोंदिया ३६.२, नागपूर ३७.२, वाशीम ३७.४, वर्धा ३७.९, यवतमाळ ३७.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com