agriculture news in Marathi, temperature increased in state, Maharashtra | Agrowon

राज्यात उन्हाचा चटका वाढला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे.  बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, विदर्भात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, शानिवारपासून (ता. २४) मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पुणे : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे.  बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, विदर्भात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, शानिवारपासून (ता. २४) मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

सोमवारपासून राज्यात मुख्यत: कोरडे हवामान असून, तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पारा ३७ अंश, तर विदर्भात ३८ अंशांच्या आसपास पोचला आहे. वर्धा, अकोला, चंद्रपूर येथे तापमान ३९ अंशांवर गेले होते. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असल्याने तापमानातील वाढ कायम राहणार असून, शुक्रवारपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रही तापणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा असून, वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. शनिरवारपासून मध्य महाराष्ट्रात, तर रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात अाली आहे. 

बुधवारी (ता. २१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.१, नगर ३८.७, जळगाव ३७.८, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर ३१.४, मालेगाव ३८.०, नाशिक ३४.७, सांगली ३७.४, सातारा ३६.८, सोलापूर ३८.६, मुंबई ३१.४, अलिबाग २९.५, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३३.९, उस्मानाबाद ३६.६, औरंगाबाद ३६.६, परभणी ३८.५, नांदेड ३७.०, अकोला ३९.५, अमरावती ३७.४, बुलडाणा ३५.०, चंद्रपूर ३९.०, गोंदिया ३७.९, नागपूर ३७.९, वाशीम ३८.०, वर्धा ३९.०, यवतमाळ ३८.०.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...