उन्हामुळे लाही लाही

उन्हामुळे लाही लाही
उन्हामुळे लाही लाही

पुणे : वाढलेल्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत  आहे. उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी तापमान गेले काही दिवस सातत्याने चाळीशी पारच आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी येथे ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.   उन्हाची ताप अधिक असल्याने नगर, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे ४० ते ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २७) राज्यात मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर विदर्भात बुधवार अणि गुरुवारी उष्णतेची लाट कायम राहणार असून, शनिवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्यास पोषक हवामान होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  मंगळवारी (ता. २४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.४, नगर ४०.३, कोल्हापूर ३७.५, महाबळेश्वर ३४.२, नाशिक ३८.८, सांगली ३९.६, सातारा ३९.०, सोलापूर ४२.१, मुंबई (सांतक्रुझ) ३४.१, अलिबाग ३४.५, रत्नागिरी ३३.४, डहाणू ३५.३, आैरंगाबाद ४०.७, परभणी ४२.९, अकोला ४३.०, अमरावती ४१.८, बुलडाणा ४०.५, ब्रह्मपुरी ४४.३, चंद्रपूर ४४.५, गोंदिया ४१.०, नागपूर ४२.०, वर्धा ४३.०, यवतमाळ ४२.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com