agriculture news in marathi, Temperature lowers as Premonsoon hits statewide | Agrowon

तापमानात घट..!
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

पुणे : पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने राज्यात तापमानाचा पारा कमालाची उतरला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात २ ते ५ अंशांची घट झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान चाळीस अंशांच्या खाली घसरले आहे. विदर्भात पारा चाळिशीपार असला तरी उन्हाचा चटका कमी झाला आहे. मंगळवारी (ता.५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

पुणे : पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने राज्यात तापमानाचा पारा कमालाची उतरला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात २ ते ५ अंशांची घट झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान चाळीस अंशांच्या खाली घसरले आहे. विदर्भात पारा चाळिशीपार असला तरी उन्हाचा चटका कमी झाला आहे. मंगळवारी (ता.५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने एप्रिल आणि मे महिन्यात अनेक ठिकाणी चाळिशी पार गेले होते. विदर्भात अनेक ठिकाणी ४५ अंशांच्या पुढे; तर मराठवाड्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमान ४४ अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेच्याची लाट आली होती. विदर्भातील चंद्रपूर येथे ३० मे रोजी तापमान ४७.९ अंशांपर्यंत गेल्याने हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. यंदा चंद्रपूर देशासह जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले; तर उन्हाचा ताप वाढल्याने महाराष्ट्र देशात सर्वांत उष्ण राज्य असल्याचे दिसून आले. विदर्भात सातत्याने तापमान अधिक असल्याने जागतिक उष्ण शहरांच्या यादीमध्ये चंद्रपूर, अकोला, बुलडाणा, वर्धा ही शहरे वरच्या क्रमांकावर होती. 

मात्र जून महिना सुरू होताच राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची छाया पसरली. पावसानेही दणक्यात हजेरी लावली. गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात मोठी घट झाली; तर रात्रीच्या तापमानही कमी झाल्याने गारठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा २५ ते ४० अंश, कोकणात ३१ ते ३६ अंश, मराठवाड्यात ३५ ते ४०; तर विदर्भात ३८ ते ४३ अंशांदरम्यान आहे. राज्यात लवकरच मॉन्सून दाखल होणार असून, त्यानंतर कमाल आणि किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता अाहे.
 
मंगळवारी (ता.५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२, जळगाव ३९.४, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्वर २५.६, मालेगाव ४०.०, नाशिक ३७.२, सांगली ३३.२, सातारा ३२.६, सोलापूर ३३.१, मुंबई ३४.८, अलिबाग ३५.६, रत्नागिरी ३१.८, डहाणू ३४.९, आैरंगाबाद ३७.७, परभणी ३९.४, नांदेड ३५.०, अकोला ४१.०, अमरावती ४१.४, बुलडाणा ३८.०, चंद्रपूर ४१.४, गोंदिया ४०.८, नागपूर ४२.४, वर्धा ४२.५, यवतमाळ ४३.०.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...