agriculture news in marathi, temperature reached above 30 degree in most places, Maharashtra | Agrowon

बहुतांश ठिकाणी पारा तिशीपार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

पुणे ः पावसाचा जोर ओसरल्याने दुपारचा उन्हाचा चटका वाढला आहे. बहुतांशी ठिकाणावरील उन्हाचा पारा तिशीच्यावर गेला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि अकोला येथे कमाल तापमान ३४.६ अंशांवर पोचले आहे. विदर्भातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. कमाल तापमानाबरोबर सातारा, सांगली, पुणे, औरंगाबाद, जळगाव येथील किमान तापमानात किंचित घट झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः पावसाचा जोर ओसरल्याने दुपारचा उन्हाचा चटका वाढला आहे. बहुतांशी ठिकाणावरील उन्हाचा पारा तिशीच्यावर गेला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि अकोला येथे कमाल तापमान ३४.६ अंशांवर पोचले आहे. विदर्भातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. कमाल तापमानाबरोबर सातारा, सांगली, पुणे, औरंगाबाद, जळगाव येथील किमान तापमानात किंचित घट झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पश्चिम बंगालचा परिसर ते बंगालचा उपसागर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा दक्षिणेकडे सरकत असून समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर कर्नाटक आणि परिसर व तमिळनाडूच्या परिसरात कमी दाबाचा क्षेत्र आहे. तर, कर्नाटक, रायलसिमा आणि तेलंगाना व कर्नाटकाचा दक्षिण परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.

बंगालचा उपसागर ते तमिळनाडू या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. हिमालयातून परतीच्या पावसासाठी अनुकूल स्थिती असून लवकरच परतीचा प्रवासास सुरवात होईल. येत्या रविवारी (ता. १६) आणि सोमवारी (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत ढगाळ हवामान होऊन तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.  

पावसाने उघडीप दिल्याने सकाळपासून उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात होत आहे. दुपारी कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यत पोचत आहे. सायंकाळी चारनंतर पारा खाली येऊन सायंकाळी सात वाजेनंतर काही प्रमाणात हवेत गारवा तयार होत आहे. मध्यरात्रीनंतर हवेत चांगलाच गारवा तयार होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे किमान तापमानाचा सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

गुरुवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपयर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):
मुंबई ३१.६, रत्नागिरी ३०.४, पुणे २९.६, सातारा ३१.०, सांगली ३२.७, मालेगाव ३२.८, जळगाव ३३.६, नाशिक २९.१, कोल्हापूर ३०.९, सोलापूर ३४.६, औरंगाबाद ३१.५, परभणी ३२.०, अकोला ३४.६, नागपूर ३४.२

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...