agriculture news in Marathi, temperature ride in state, Maharashtra | Agrowon

आॅक्टोबर हीट हळूहळू वाढतेय...
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

पुणे ः देशातून माॅन्सून परतल्याने आकाश निरभ्र राहत आहे. त्यामुळे आॅक्टोबर हीटही हळूहळू वाढू लागली असून, उकाड्यात वाढ होत आहे. मुंबईजवळ असलेल्या सांताक्रूझमध्ये सोमवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे ः देशातून माॅन्सून परतल्याने आकाश निरभ्र राहत आहे. त्यामुळे आॅक्टोबर हीटही हळूहळू वाढू लागली असून, उकाड्यात वाढ होत आहे. मुंबईजवळ असलेल्या सांताक्रूझमध्ये सोमवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. 

राज्यात वाढत असलेल्या आॅक्टोबर हीटमुळे कोकणातील बहुतांशी भागातील कमाल तापमानाच सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे कोकणातील कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सांताक्रूझनंतर मुंबईमध्ये कमाल तापमानाची ३७.० अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. 

मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने तुरळक ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत. परिणामी या भागातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रात सोलापूरमध्ये कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस, तर महाबळेश्वरमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १७.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातील बहुतांशी ठिकाणचा कमाल तापमानाचा पारा हा ३४ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. बीडमध्ये सर्वाधिक ३७.० अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भातील अनेक भागांत हवामान कोरडे होते. त्यामुळे विदर्भाच्या अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली होती. अकोला येथे कमाल तापमान ३७.० अंश सेल्सिअस होते. उर्वरित भागात  ३४ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान  होते. 

अरबी समुद्रात ‘लुबन’ चक्रीवादळ 
दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘लुबन’ या चक्रीवादळात रूंपातर झाले आहे. हे चक्रीवादळ ओमान आणि येमेनच्या दिशेने सरकत असून, पुढील चार ते पाच दिवसांनंतर त्याची तीव्रता कमी होणार आहे. आज (ता. ९) आणि या चक्रीवादळाची तीव्रता अधिक वाढणार आहे.  

मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता 
अरबी समुद्रात तयार झालेले ‘लुबन’ चक्रीवादळ आणि बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील काही भागांत हवामान ढगाळ राहणार आहे. आज (ता. ९) आणि उद्या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहील. शुक्रवारी (ता. १२) विदर्भात अंशत हवामान ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

सोमवारी (ता. ८) सकाळच्या चोवीस तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 
 मुंबई ३७.०, सांताक्रूझ ३७.८, अलिबाग ३५.७, रत्नागिरी ३६.०, डहाणू ३५.३, पुणे ३३.६, लोहगाव ३४.१, कोल्हापूर ३३.०, महाबळेश्वर २६.७, मालेगाव ३५.८, नाशिक ३३.३, सांगली ३३.४, सातारा ३१.८, सोलापूर ३६.३, औरंगाबाद ३४.८, परभणी ३५.०, नांदेड ३५.०, बीड ३७.०, अकोला ३७.०, अमरावती ३६.०, बुलडाणा ३२.०, चंद्रपूर ३५.६, गोंदिया ३४.२, नागपूर ३५.३, वर्धा ३५.२, यवतमाळ ३५.५.

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...