agriculture news in marathi, temperature rise | Agrowon

थंडीचा कडाका झाला कमी
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली अाहे. तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेल्याने राज्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. शनिवारी (ता. १२) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १३) विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानाची शक्यता आहे. तर किमान तापमानातही चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. 

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली अाहे. तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेल्याने राज्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. शनिवारी (ता. १२) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १३) विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानाची शक्यता आहे. तर किमान तापमानातही चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. 

राजस्थानपासून, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकदरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्राणीय स्थिती) सक्रिय असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरावरून उष्ण व दमट वारे महाराष्ट्रात येत असल्याने ढगाळ हवामानाची शक्यता अाहे. शनिवारी (ता. १२) राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८ अंश सेल्सिअस, नगर ९.१ अंश, नाशिक ९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर उर्वरित राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या पुढे गेले आहे.  

शनिवारी (ता. १२) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.७ (-०.७), नगर ९.१ (-२.८), कोल्हापूर १५.९ (०.६), महाबळेश्‍वर १४.२ (०.८), मालेगाव ११.० (०.२), नाशिक ९.६, सांगली १३.३ (-१.०), सातारा १२.२ (-०.७), सोलापूर १६.६ (०.१), सांताक्रूझ १५.२ (-२.१), अलिबाग १५.६ (-२.१), रत्नागिरी १६.७ (-२.६), डहाणू १३.९ (-३.३), आैरंगाबाद १२.० (-०.४), परभणी १४.५ (०.२), नांदेड १३.५ (-०.२), अकोला १४.६ (०.२), अमरावती १३.२ (-१.३), बुलडाणा १५.४ (०.८), चंद्रपूर १२.४ (-२.२), गोंदिया १०.८ (-२.४), नागपूर १०.२ (-३.२), वर्धा १३.४ (०), यवतमाळ १६.० (०.८).

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...