agriculture news in Marathi, temperature rise instate, Maharashtra | Agrowon

चटका वाढला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत आहे. रविवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील तापमानात सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांची वाढ झाली आहे. सांताक्रुज आणि नगर येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रातील वादळाच्या प्रभावामुळे आज (ता.८) कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत आहे. रविवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील तापमानात सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांची वाढ झाली आहे. सांताक्रुज आणि नगर येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रातील वादळाच्या प्रभावामुळे आज (ता.८) कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या उघडिपीनंतर राज्यात सातत्याने सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंदले जात आहे. मॉन्सून राज्याचा निरोप घेतल्यांनतर दोन दिवस मुख्यत: कोरडे हवामान असल्याने कोकणातील तापमानात सर्वाधिक वाढ झाली आहे. सांताक्रुझबरोबर कुलाबा, रत्नागिरी, डहाणू येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले आहे. नगर, जळगाव, सोलापूर, बीड, अकोला, ब्रह्मपुरी, येथेही पारा ३६ अंशांवर आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश, मराठवाडा ३ ते ४ अंशांची वाढ झाली आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी रात्रीचे तापमान सरासरीच्या जवळपास आहे. 
अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, आज (ता. ८) त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचे संकेत आहे. रविवारी दुपारी ही प्रणाली ओमानच्या सलालाह पासून १३४० किलोमीटर, येमेनच्या सोकोट्रा बेटापासून १२५० किलोमीटर अग्नेय दिशेला, तर मिनिकॉय बेटांच्या वायव्येकडे ९४० किलोमीटर समुद्रात घोंगावत होती.

अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली अाहे. तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून, मंगळवारपर्यंत (ता. ९) या भागात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातही उत्तर अंदमान समुद्रातही रविवारी (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढत आहे.
 
रविवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.१, नगर ३७.२, जळगाव ३६.२, कोल्हापूर ३३.०, महाबळेश्‍वर २६.३, मालेगाव ३५.६, नाशिक ३३.३, सांगली ३३.४, सातारा ३०.६, सोलापूर ३६.०, सांताक्रुझ ३७.२, अलिबाग ३५.४, रत्नागिरी ३६.४, डहाणू ३६.३, आैरंगाबाद ३४.५, परभणी ३५.४, नांदेड ३४.०, बीड ३६.४, अकोला ३६.७, अमरावती ३५.८, बुलडाणा ३२.५, ब्रह्मपुरी ३६.१, चंद्रपूर ३५.८, गोंदिया ३४.०, नागपूर ३५.१, वर्धा ३५.०, यवतमाळ ३५.०.

मॉन्सून देशातून परतणार
नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) आज (ता. ८) देशातून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागातून शनिवारी (ता.६) मॉन्सून परतला आहे. आजपासून दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांत ईशान्य मॉन्सून सक्रिय होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...