agriculture news in marathi, temperature rise in state, Maharashtra | Agrowon

तापमानाचा ‘पारा’ चढला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

पुणे: पावसाने दडी मारताच राज्यात निरभ्र आकाश होत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा ‘पारा’ चढल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. मंगळवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पोषक हवामान नसल्याने काही दिवस पावसाची मुख्यत: उघडीप राहणार असून, तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता अाहे. 

पुणे: पावसाने दडी मारताच राज्यात निरभ्र आकाश होत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा ‘पारा’ चढल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. मंगळवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पोषक हवामान नसल्याने काही दिवस पावसाची मुख्यत: उघडीप राहणार असून, तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता अाहे. 

राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेले आहे. कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर गेला असून, कोकणात ३१ ते ३२ अंशांच्यादरम्यान आहे; तर मध्य महाराष्ट्रात २८ ते ३६ अंश, मराठवाड्यात ३१ ते ३३ अंश, तर २९ ते ३५ अंशांच्या आसपास तापमानाची नोंद होत आहे. सोलापूरसह चंद्रपूर, वर्धा येथे उन्हाच्या झळा अधिक आहेत. राज्यात पावसाने मारलेली दडी शनिवारपर्यंत (ता.१५) कायम राहण्याची शक्यता अाहे.
 
मंगळवारी (ता.११) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.३, जळगाव ३३.०, कोल्हापूर २९.६, महाबळेश्‍वर २१.४, मालेगाव ३१.६, नाशिक २८.७, सातारा ३०.७, सोलापूर ३५.५, मुंबई ३२.०, अलिबाग ३२.२, रत्नागिरी ३०.२, डहाणू ३१.४, आैरंगाबाद ३१.८, परभणी ३२.४, अकोला ३२.३, अमरावती ३२.४, बुलडाणा २९.४, चंद्रपूर ३४.८, गोंदिया ३१.८, नागपूर ३३.३, वर्धा ३४.०, यवतमाळ ३२.०.

इतर बातम्या
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
कृषी विद्यापीठ संत्रा बाग छाटणी सयंत्र...नागपूर ः संत्रा छाटणी सयंत्राला संत्रा...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
ऊसबिल थकल्याने कोलमडले अर्थकारणकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात तोडणी झालेल्या...
कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणारमुंबई  ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी...पुणे: अन्नधान्य उत्पादनात देशात सर्वांत चांगली...
पेथाई चक्रीवादळ आज धडकणारपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई...
कृषी विद्यापीठ देणार सेंद्रिय कापसाचा...नागपूर ः सेंद्रिय अन्नधान्यासोबतच येत्या काही...
माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यासाठी आंदोलनआपटाळे, जि. पुणे ः माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यात...
कापूस उत्पादकतेत महाराष्ट्र मागेजळगाव : कापूस उत्पादकतेमध्ये राज्य मागील चार...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६८ प्रकल्पांतील...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...