agriculture news in marathi, temperature rise in state , Maharashtra | Agrowon

राज्याच्या तापमानात वाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मराठवाड्यातील बीड येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मंगळवारी (ता. २५ सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. राज्यात ढगाळ हवामान असून आज (ता. २६) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

पुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मराठवाड्यातील बीड येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मंगळवारी (ता. २५ सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. राज्यात ढगाळ हवामान असून आज (ता. २६) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

 ‘दाये’ चक्रीवादळ विरून गेल्यानंतर राजस्थानमध्ये काेरडे हवामान होऊ लागले आहे. गुरुवारपासून या भागातील वाऱ्यांची दिशा बदलणार असून, शनिवारी (ता. २९) नैऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) परतीच्या प्रवासाला सुरवात करण्याची श्‍ाक्यता आहे. तर राज्यात अनेक भागात कोरडे हवामान असून, सोमवारी सायंकाळनंतर मध्य महाराष्ट्रातील नगर, सातारा, मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातील वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. 

दरम्यान राज्याच्या तापमानातही वाढ होत असून, मराठवाड्यात तापमान ३२ ते ३६ अंशांच्या आसपास आहे. तर विदर्भात तापमानाचा पारा ३० ते ३४ अंश, मध्य महाराष्ट्रात २९ ते ३५ अंश आणि कोकणात ३१ ते ३३ अंशांच्या जवळपास पोचला आहे. पावसाच्या उघडिपीमुळे राज्याच्या किमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.१, जळगाव ३३.२, कोल्हापूर ३१.९, महाबळेश्‍वर २४.४, मालेगाव ३५.७, नाशिक २९.७, सांगली ३२.७, सातारा ३२.६, सोलापूर ३५.२, मुंबई ३२.२, अलिबाग ३२.९, रत्नागिरी ३१.०, डहाणू ३२.८, आैरंगाबाद ३२.८, परभणी ३५.०, नांदेड ३५.०, बीड ३६.०, अकोला ३३.२, अमरावती ३३.४, बुलडाणा ३०.४, ब्रह्मपुरी ३३.७, चंद्रपूर ३२.०, गोंदिय ३२.३, नागपूर ३३.५, वर्धा ३४.०, यवतमाळ ३३.०.

मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) :
मध्य महाराष्ट्र : वांभोरी ५२, संगमनेर १६, घारगाव २४, लोणी १७, पुसेगाव ४८, वाई १५, कराडवाडी १२.
मराठवाडा : धर्मापुरी २१, वाडवणी २०, अहमदपूर ६५, किनगाव ५७, आंदोरी ३२, नांदेड शहर १२, नांदेड ग्रामीण १५, तुप्पा २०, वसरणी १३, तरोडा २०, फुलवल ४०, मालकोळी २१, कळंबर १०, सिंधखेड 
१४, दाभाड ४४, मालेगाव ५७, शिंगणापूर
३५, पिंगळी १९, परभणी ग्रामीण १७, राणी १५, कळमेश्‍वर ३७, बनवास ६०, 
केकरजवळा २८, वाकाेडी १४, वसमत १५, हयातनगर ६१.
विदर्भ : आनसिंग १८, कोंढळा १८, असरे १८, मालेगाव १३, शिरपूर ३१, मुंगळा २०, करंजी ११, मंगरूळपीर २०, असेगाव ४०, धनोरा ३०, चिखलदारा २६, पुसळा २०, काप्रा २०, येळबारा १२, सावळी २१, नेर १९, पुसद १२, शेंबळ ३४, ब्राह्मणगाव १९, उमरखेड १४, बिटरगाव १०, रुंजा २४, शिवणी १४, घोटी १०, कुरळी १८, धानोरा १३, वाढोणा २७, खामगाव १३, शिरसगाव १२, जांब १०, कामठी ५४, वडोदा १२, नवेगाव २३, कन्हान २१, कोंढाळी १२, खापा २०, कुही १४.

इतर अॅग्रो विशेष
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...