agriculture news in Marathi, temperature rise in state, Maharashtra | Agrowon

उन्हाचा चटका वाढला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल तापमानात वाढ होत आहे. रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये तापमानात वाढ होऊन अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांवर गेला आहे. अमरावती, बीड, जळगावमध्ये ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. आजपासून (ता. २२) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल तापमानात वाढ होत आहे. रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये तापमानात वाढ होऊन अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांवर गेला आहे. अमरावती, बीड, जळगावमध्ये ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. आजपासून (ता. २२) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

ऑक्टोबर हीटचा चटका वाढला असतानाच, गेल्या आठवड्यात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यातही अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. त्यामुळे कमाल तापमानात घट हाेऊन पारा ३५ अंशांच्या खाली घसरला. तर, १४ अंशांपर्यंत खाली आलेले रात्रीचे तापमान पुन्हा १६ अंशांच्या वर गेले. दोन दिवसांपासून राज्यात आकाश निरभ्र होत असून, तापमान सरासरीच्या वर गेले आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये बीड आणि अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश, तर परभणी येथे नीचांकी १६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

रविवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.८ (२०.२), जळगाव ३७.० (२०.०), कोल्हापूर ३१.६(२०.८), महाबळेश्‍वर २६.८(१७.२), मालेगाव ३६.४(२३.४), नाशिक ३४.२(१९.०), सांगली ३३.४(१८.७), सातारा ३२.५(१८.१), सोलापूर ३५.६ (२१.०), सांताक्रुझ ३५.१(२५.२), अलिबाग ३४.६(२४.६), रत्नागिरी ३५.०(२२.६), डहाणू ३४.०(२४.९), आैरंगाबाद ३४.७ (१८.०), परभणी ३५.४(१६.६), नांदेड ३५.० (१९.०), बीड ३७.२, अकोला ३६.५(२०.६), अमरावती ३७.२(२०.८), बुलडाणा ३५.७ (२१.४), चंद्रपूर ३५.८ (२३.२), गोंदिया ३५.०(२१.२), नागपूर ३५.५(१९.२), वर्धा ३५.४(१९.०), यवतमाळ ३६.५ (२०.०).

इतर अॅग्रो विशेष
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
कपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...
जिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशा?नगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...
भातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...
'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...
बोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...
शेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...
दुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...
कर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...
सोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...