agriculture news in Marathi, temperature variation in morning and afternoon, Maharashtra | Agrowon

सकाळी गारठा, तर दुपारी चटका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले असतानाच, रात्रीचे किमान तापमान घसरण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात कमाल, किमान तापमानातील तफावत वाढली असून, सकाळी गारठा, तर दुपारी चटका, अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस, तर मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

पुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले असतानाच, रात्रीचे किमान तापमान घसरण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात कमाल, किमान तापमानातील तफावत वाढली असून, सकाळी गारठा, तर दुपारी चटका, अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस, तर मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम आहे. अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांपेक्षा अधिक असून, पारा ३५ अंशांच्या वर जात आहे. जळगाव, मालेगाव, सोलापूर, सांताक्रूझ, डहाणू, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ येथे उन्हाचा चटका अधिक आहे. रात्रीच्या वेळी तापमान घसरल्याने दिवस आणि रात्रीच्या तापमानात १२ ते २० अंशांची तफावतही होत आहे. पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पसरू लागली आहे.

आॅक्टोबरच्या सुरवातीला राज्यात १७ ते २६ अंशांच्या दरम्यान असलेले तापमान सोमवारी १४ ते २४ अंशांपर्यंत खाली आले होते. किमान तापमानात सरसरीपेक्षा २ ते ३ अंशांची घट झाली असून, अनेक ठिकाणी पारा २० अंशांच्या खाली उतरला आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली आले आहे. जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्‍वर, परभणी, उस्मानाबाद, अकोला, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील तापमानात सरासरीपेक्षा घट झाल्याचे दिसून आले. 

सोमवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.२(१८.६), नगर -(१६.०), जळगाव ३६.६(१८.०), कोल्हापूर ३४.१(२१.८), महाबळेश्‍वर २८.१(१७.२), मालेगाव ३५.४(२०.४), नाशिक ३४.४(१७.३), सांगली ३४.३(१९.२), सातारा ३३.१(१९.४), सोलापूर ३७.०(२०.६), सांताक्रूझ ३५.५(२३.५), अलिबाग ३२.७(२३.७), रत्नागिरी ३४.४(२३.५), डहाणू ३६.१(२३.७), आैरंगाबाद ३५.१ (१७.०), परभणी ३५.१(१५.१), नांदेड ३६.०(२०.०), उस्मानाबाद -(१४.५), अकोला ३५.६(१९.५), अमरावती ३५.६(१९.४), बुलडाणा ३१.२(१९.२), चंद्रपूर ३५.२ (२२.६), गोंदिया ३५.५(१९.४), नागपूर ३४.४(१८.६), वर्धा ३४.६(१८.०), यवतमाळ ३६.०(१९.०).

कोकणात हलक्या पावसाची शक्यता
अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, कर्नाटक किनारपट्टीजवळ ढगांची दाटी झाली आहे.  दक्षिण तमिळनाडू, कर्नाटकमध्ये असलेल्या दोन चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. आजपासून (ता. १६) दक्षिण कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यातील किमान तापमानाची तुलनात्मक स्थिती (अंश सेल्सिअसमध्ये)

विभाग  १ ऑक्टोबर   १५ ऑक्टोबर
कोकण    २४ ते २६   २३ ते २४
मध्य महाराष्ट्र   १८ ते २४    १६ ते २२
मराठवाडा    १७ ते २२  १४ ते २०
विदर्भ    २१ ते २५ १८ ते २३

 

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...