agriculture news in marathi, temperature, weather, forecast, pune | Agrowon

यवतमाळ 36.5 अंशांवर
संदीप नवले
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

आज (शनिवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

पुणे : हवेतील बाप्ष कमी होत असल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.6) सकाळपर्यंत विदर्भातील यवतमाळ येथे कमाल तापमान 36.5 अंशांपर्यंत पोचले होते. दुपारी पुण्यासह काही भागात पावसाने हजेरी लावली. आज (शनिवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या आठवड्यापासून परतीचा पाऊस सुरू झाला असून, वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहू लागले आहेत. त्यातच दक्षिणेकडील कमाल तापमान हळूहळू वाढू लागले आहे; परंतु काही भागांत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. शुक्रवारी (ता.6) सकाळपासून कडक ऊन पडले होते. त्यामुळे दुपारी कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली होती. दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे शहराच्या काही भागांत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मराठवाडा; तर विदर्भात अनेक ठिकाणी सकाळपासून ऊन पडल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाली होती. रात्रीच्या किमान तापमानातही घट झाली असून औरंगाबादमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंशांनी कमी होऊन 15.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

येत्या सोमवारपर्यंत (ता.9) गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता आहे. आज (शनिवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी येत्या मंगळवारपर्यंत (ता.10) हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे 34.1, जळगाव 35.4, कोल्हापूर 33.0, मालेगाव 35.8, नाशिक 33.0, सांगली 33.9, सातारा 31.8, सोलापूर 34.5, मुंबई 32.8, सांताक्रुझ 34.7, अलिबाग 32.4, रत्नागिरी 31.8, औरंगाबाद 34.0, परभणी 34.8, अकोला 35.6, अमरावती 30.4, चंद्रपूर 34.2, गोंदिया 33.4, नागपूर 33.6, वाशीम 34.0, वर्धा 32.5, यवतमाळ 36.5

इतर ताज्या घडामोडी
चोपडा, जळगावातून केळीचा पुरवठा वाढलाजळगाव ः जिल्ह्यात मागील आठवड्यात केळीच्या दरात...
नगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटलनगर ः खरिपातील मुगाचे पीक हाती आले असल्याने नगर...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...
सोलापुरात भाज्या वधारल्या सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊसनाशिक : दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या मालेगाव...
इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीजचीज जितके जुने, तितके अधिक चांगले असे समजले जाते...
खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब...अमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक...
निवडून येण्याची क्षमता असलेल्या...पुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार...
पुणे जिल्हा बॅंकेकडून ६४ टक्के पीककर्ज...पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक...
समविचारी पक्षांशी युती करून निवडणूक...भंडारा  ः केंद्र आणि राज्यातील सरकारकडून...
मराठा आरक्षणासाठी पुण्यात चक्री उपोषण...पुणे : मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान...
अतिवृष्टीचा अकोला जिल्ह्यात ३०००...अकोला : गेल्या अाठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा...
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा...सातारा   ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
अकोला, वाशीममधील प्रकल्पांतील...अकोला  : कमी पावसामुळे प्रकल्पांमधील...
अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस...नगर   ः जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्...
पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...