agriculture news in marathi, Temporary suspension of Vijay sugars auctioneer | Agrowon

पंढरपुरातील ‘विजय शुगर्स’च्या लिलावास तात्पुरती स्थगिती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

सोलापूर : करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर कारखान्याच्या लिलावास मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने लिलावास स्थगिती मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान लिलावास तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती तहसीलदार मधूसुदन बर्गे यांनी दिली. आता पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी होणार आहे.

सोलापूर : करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर कारखान्याच्या लिलावास मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने लिलावास स्थगिती मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान लिलावास तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती तहसीलदार मधूसुदन बर्गे यांनी दिली. आता पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी होणार आहे.

नऊ कोटी २३ लाख रुपयांच्या थकीत ऊसबिलाच्या वसुलीसाठी राज्य साखर आयुक्तांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना विजय शुगर साखर कारखान्याच्या मालमत्तेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम द्यावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विजय शुगर कारखान्याच्या विक्री लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार सोमवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता लिलाव करण्यात येणार होता.

दरम्यान, तहसीलदारांनी न्यायालयाच्या आदेशाने लिलाव स्थगित करत असल्याचे जाहीर जाहीर केले. कारखान्याच्या या लिलावामध्ये बबनराव शिंदे शुगर प्रा. लि., विठ्ठल इंडस्ट्रीज प्रा. लि., टेंभुर्णी आणि बी. पी. रोंगे आदींनी भाग घेतला होता. परंतु, न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती मिळताच लिलावात भाग घेण्यासाठी आलेल्यांचा काहीसा हिरमोड झाला.

लिलाव प्रक्रियेवर जिल्हा बॅंकेची हरकत
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विजय शुगर कारखान्याकडे जवळपास १६० कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. कर्ज वसुलीसाठी यापूर्वीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने विजय शुगर कारखान्याच्या लिलावास परवानगी मागितली आहे. त्यापूर्वीच पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना व परिसरातील शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीच्या नऊ कोटी २३ लाख रुपयांच्या वसुलीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार साखर आयुक्तांनी लिलाव करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हा बॅंकेने लिलाव प्रक्रियेवर हरकत घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने विक्री लिलाव करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे.

इतर बातम्या
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...