agriculture news in Marathi, Ten crore subsidy distributed for community farm ponds, Maharashtra | Agrowon

सामूहिक शेततळ्यासाठी दहा कोटींचे अनुदानवाटप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

पुणे : राज्यातील काही कोरडवाहू जिल्ह्यांत सामूहिक शेततळ्याची संकल्पना रुजविण्यात कृषी खात्याला यश मिळते आहे. राज्यात १५ डिसेंबरपर्यंत तळे बांधलेल्या शेतकऱ्यांना ९ कोटी ५७ लाख रुपये वाटण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामधून (एनएचएम) उस्मानाबाद आणि सोलापूर भागांत सर्वांत जास्त सामूहिक शेततळी आकाराला आली आहेत. 

पुणे : राज्यातील काही कोरडवाहू जिल्ह्यांत सामूहिक शेततळ्याची संकल्पना रुजविण्यात कृषी खात्याला यश मिळते आहे. राज्यात १५ डिसेंबरपर्यंत तळे बांधलेल्या शेतकऱ्यांना ९ कोटी ५७ लाख रुपये वाटण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामधून (एनएचएम) उस्मानाबाद आणि सोलापूर भागांत सर्वांत जास्त सामूहिक शेततळी आकाराला आली आहेत. 

‘एनएचएम’मधून सामूहिक शेततळ्यासाठी राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये १५ कोटी रुपये अनुदान वाटण्याचे प्रस्ताव कृषी विभागाने सादर केले होते. मात्र, योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून काही जिल्ह्यांसाठी अनुदान वाढवून देण्यात आले. त्यामुळे सुधारित आराखड्यानुसार तळ्यांसाठी यंदा २० कोटी ५७ लाख रुपये वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात १५ डिसेंबरपर्यंत तळे बांधलेल्या शेतकऱ्यांना ९ कोटी ५७ लाख रुपये वाटण्यात आले आहेत. यात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी २२ लाख रुपये, तर उस्मानाबादमध्ये दोन कोटी ६० लाख रुपये देण्यात आलेले आहेत. 

कोरडवाहू जिल्ह्यांमध्ये सामूहिक शेततळ्याची संकल्पना रुजवण्यात यश मिळते आहे. त्यामुळेच औरंगाबादला आतापर्यंत ४१ लाख, जालना ९० लाख, बीड ६४ लाख, लातूर ४७ लाख तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५२ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. सामूहिक शेततळे उभारण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. सातबारा व आठ ''अ''च्या उताऱ्यासह शेतकऱ्यांना पाणी व जमीनवापराबाबत आपआपसातील सामंजस्य करार १०० रुपयांच्या स्टॅंपपेपरवर लिहून द्यावा लागतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अजून साडेदहा कोटी रुपये वाटले जाण्याची शक्यता
सामूहिक शेततळ्यासाठी एनएचएममधून राज्यात अजून साडेदहा कोटी रुपये अनुदानपोटी वाटले जाण्याची शक्यता आहे. जिल्हास्तरीय समितीने शेतकऱ्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर एक महिन्याच्या आत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे अंतिम प्रस्ताव सादर होतात. ‘जिल्हा अधीक्षकाने मंजुरी दिल्यानंतर तीन महिन्यांत शेतकऱ्याला शेततळे उभारावे लागते. तळ्याचे मातीकाम पूर्ण झाल्यानंतर ८० टक्के अनुदान मिळते व उर्वरित अनुदान तळ्यात पाणी साठल्यानंतर दिले जाते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...