जांभरुण परांडे गावात जन्माला आली जातिवंत वासरे

जांभरुण परांडे गावात जन्माला आली जातिवंत वासरे
जांभरुण परांडे गावात जन्माला आली जातिवंत वासरे

अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे वंशावळ सुधारणेअंतर्गत जातिवंत वासरे गोठ्यात जन्माला घालण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. याअंतर्गत जातिवंत वंशाची दहा वासरे जन्माला आली आहेत.  वाशीम येथील सामाजिक कार्यकर्ते रवी मारशेटवार यांच्याद्वारे देशी गोवंश संगोपनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासोबतच देशी गायींची वंशावळ सुधारणा करीत किमान सात ते दहा लिटर दूध दररोज देणारी पुढील पिढी कशी जन्माला येऊ शकते, याविषयीदेखील ते मार्गदर्शन करतात.  जांभरुण परांडे गावात वंशावळ सुधारणा कार्यक्रमांतर्गत एकूण दहा जातिवंत वंशाची वासरे जन्माला आली आहेत. त्यासाठी करण्यात आलेल्या कृत्रिम रेतनाकरिता साबरमती आश्रम गोशाळा बिडज (गुजरात) व उरळी कांचन (पुणे) येथील बायएफ संस्थेचे थारपारकर व साहिवाल जातीचे रेतमात्रा वापरण्यात आले आहे. मारशेटवार हे वर्षभर गुणवत्तापूर्ण व भरपूर दूध देणाऱ्या  जातिवंत व दुधाळ गोवंशाची रेतमात्रा शेतकऱ्यांना मोफत देतात. जांभरुण परांडे येथील गोपालकांनी कृत्रिम रेतन यशस्वी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com