agriculture news in marathi, Ten lakhs rupees for the 'humani' in the district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील ‘हुमणी'ग्रस्त उसासाठी दहा लाखांची तरतूद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील उसाला हुमणीअळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. मोठे नुकसान होत आहे. त्यावरील नियंत्रणासाठी कृषी विभागासह कृषी संशोधन केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी आता जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागानेही पुढाकार घेतला असून हुमणीग्रस्त भागातील उसावर नियंत्रणासाठी आवश्‍यक असलेल्या जैविक खतमात्रेसाठी १० लाखांची तरतूद करण्याचा निर्णय कृषी समितीच्या बैठकीत घेतला आहे.

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील उसाला हुमणीअळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. मोठे नुकसान होत आहे. त्यावरील नियंत्रणासाठी कृषी विभागासह कृषी संशोधन केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी आता जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागानेही पुढाकार घेतला असून हुमणीग्रस्त भागातील उसावर नियंत्रणासाठी आवश्‍यक असलेल्या जैविक खतमात्रेसाठी १० लाखांची तरतूद करण्याचा निर्णय कृषी समितीच्या बैठकीत घेतला आहे.

जिल्हा परिषद कृषी समितीची बैठक बुधवारी (ता. ५) सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, मोहोळ, माळशिरस, करमाळा या भागात सध्या उसावर मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्याच मुद्यावर बैठकीत अनेक सदस्यांनी चर्चेची सुरवात केली.

या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, ऊस उत्पादनात मोठी घट होणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्त्रोत कमी होण्याचा धोका आहे. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तातडीने कीड प्रतिबंधासाठी शोध लावावा, अशी मागणी केली. त्यावर चर्चा करून तज्ज्ञांच्या साह्याने जैविक खताद्वारे कीडग्रस्त उसाला आधार मिळावा, यासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. पॉवर टिलरसाठीच्या ४५ लाख रुपयांच्या तरतुदीपैकी १० लाख रुपये जैविक खतासाठी व उर्वरित ३५ लाख रुपये रोटावेटर खरेदीसाठी वर्ग करण्याचा निर्णय झाल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.

कृतिनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. पुढील आठवड्यात होणाऱ्या पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत आदर्श गोपालक पुरस्कारांच्या वितरणासाठी प्रस्ताव सादरीकरणाच्या सूचना दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

इतर बातम्या
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्रनाशिक : भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभकळवण, जि. नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज...वैराग, जि. सोलापूर : ‘‘शेतीचे प्रश्न वाढतायेत, ते...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...