agriculture news in marathi, Tender for big companies for agricultural pumps | Agrowon

कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

बारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत. निविदा प्रक्रियेत मोठमोठ्या कंपन्यांनी उत्सुकता दाखविल्याने महावितरणने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. सुमारे पाच हजार ४८ कोटींच्या या योजनेस स्थानिक ठेकेदारांनी ठेंगा दाखविल्याने ३१ मार्चपर्यंत प्रलंबित असलेल्या शेतीपंपांच्या वीजजोडाचा प्रश्न लटकला होता.

बारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत. निविदा प्रक्रियेत मोठमोठ्या कंपन्यांनी उत्सुकता दाखविल्याने महावितरणने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. सुमारे पाच हजार ४८ कोटींच्या या योजनेस स्थानिक ठेकेदारांनी ठेंगा दाखविल्याने ३१ मार्चपर्यंत प्रलंबित असलेल्या शेतीपंपांच्या वीजजोडाचा प्रश्न लटकला होता.

पुणे जिल्ह्यातील २२ हजार शेतकरी गेल्या चार वर्षांपासून वीजपुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहेत. मध्यंतरी इंफ्रा-२ मधून महावितरण या शेतकऱ्यांना वीजपंपाचे जोड देत होते. मात्र, आघाडी सरकारनंतर भाजप सरकारने यात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याच्या कारणावरून ही योजना बंद केली, त्यामुळे प्रलंबित शेतकऱ्यांची संख्या वाढली. कृषिपंपांचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी भाजप सरकारने एचव्हीडीसी योजना आणली, मात्र प्रत्यक्ष बाजारातील साहित्याचा दर व वीज कंपनीने दिलेला दर याच्यात २५ टक्‍क्‍यांपर्यंत तफावत असल्याने स्थानिक ठेकेदार निविदा भरत नव्हते. त्यावर सरकारने पुन्हा ८ टक्के दर वाढवून दिला, तरीही ठेकेदारांनी काम करण्यास तयारी दाखवली नाही. निविदांच्या तारखा तीन वेळा बदलल्या, तरीही फरक पडला नव्हता, त्यातच शेतकऱ्यांचा संताप वाढत चालला असल्याने सरकारी पातळीवर गांभीर्याने या संदर्भात प्रयत्न सुरू होते. सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा महावितरणने केला आहे. 

महावितरणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, यापूर्वी राज्यातील कृषिपंपांसाठी उच्चदाब वीज यंत्रणेतून वीजजोडणी  देण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया स्थानिक पातळीवर राबविली. स्थानिकांना कामे मिळावीत हा उद्देश होता. मात्र, स्थानिक ठेकेदारांनी ही कामे स्वीकारली नसल्याने महावितरणने मोठ्या कंपन्यांना आमंत्रित केले. त्यात टाटा प्रोजेक्‍ट, नागार्जुन कन्स्ट्रक्‍शन कंपनी, एल अँड टी, होल्टास, अग्रवाल पॉवर कंपनी लि., भारत इलेक्‍ट्रिकल्स अशा १६ कंपन्यांनी सहभाग नोंदविल्याचा दावा महावितरणने केला आहे.

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...