agriculture news in marathi, Tension in Rural Hospital in Dhamangaon | Agrowon

धामणगावातील ग्रामीण रुग्णालयात तणाव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

धामणगाव रेल्वे, अमरावती : नरभक्षक वाघाने बळी घेतलेल्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे नाही, या मागण्या घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयात जमाव  संतप्त झाला होता. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल ६ तासांनंतर शवविच्छेदन करण्यात आले.

धामणगाव रेल्वे, अमरावती : नरभक्षक वाघाने बळी घेतलेल्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे नाही, या मागण्या घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयात जमाव  संतप्त झाला होता. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल ६ तासांनंतर शवविच्छेदन करण्यात आले.

नरभक्षक वाघाने तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर व अंजनसिंगी येथील मोरेश्वर वाळके यांचा बळी घेतला. त्यामुळे वन विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे, असा आरोप जमावाने केला. दरम्यान अमरावतीचे खासदार आनंद अडसूळ आदींनी भेट दिली. प्रादेशिक विभागाचे मुख्य वन संरक्षक डाॅ. प्रवीण चव्हाण यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला.

वाघ जेरबंद करणे, बेशुद्ध करून पकडणे याबाबत वरिष्ठांकडून परवानगी प्राप्त होताच तत्काळ कारवाई व त्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे. दोन्ही कुटुंबांना शासन निर्णयानुसार प्रत्येकी १० लाख रुपये मदत प्रस्ताव प्राप्त होताच देण्यात येईल. दोन्ही कुटुंबांतील एका व्यक्तीस शासकीय सेवेमध्ये सामील करून घेण्याबाबतचा विशेष बाब प्रस्ताव शासनास तत्काळ सादर करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले. वन संरक्षक हरिश्चंद्र वाघमोडे, उपविभागीय अधिकारी स्नेहल कनिचे, सहायक वन संरक्षक अशोक कवीटकर, तहसीलदार अभिजित नाईक आदी उपस्थित होते.

 

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...