सांगलीत दगडफेकीने तणाव

सांगली जिल्ह्यात तणाव
सांगली जिल्ह्यात तणाव

सांगली ः ‘आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी सांगली शहरासह ग्रामीण परिसर गुरुवारी (ता. ९) सकाळपासून दणाणून सोडला. सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुपारी तीनच्या सुमारास बस स्थानकाजवळ दगडफेक झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला.

सांगली शहरातील सर्व व्यापारी पेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. रस्त्यावरून आंदोलनकर्ते घोषणा रॅली काढत होते. शहरातील स्टेशन चौकात कार्यकर्ते एकत्र जमले होते. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्टेशन चौकात आंदोलन सुरू असल्यामुळे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. ग्रामीण भागात ही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. कार्यालये बंद ठेवण्यात आली होती.

मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दूध संकलन बंद ठेवण्यात आले. दूध संकलन बंद असल्याने सुमारे ७ लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प राहिले. अत्यावश्‍यक सेवांमध्ये रुग्णालये, औषधालये आणि इंधन पंप सुरू ठेवण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com