दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना योग्य शिक्षा दिली जाईल

दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना योग्य शिक्षा दिली जाईल
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना योग्य शिक्षा दिली जाईल

पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे. सीआरपीएफमध्ये चीड असून, आम्ही सुरक्षा दलांना सूट दिली आहे. दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना योग्य शिक्षा दिली जाईल. देशाला मी पुन्हा विश्वास देतो की धैर्य ठेवा. पुलवामातील गुन्हेगारांना शिक्षा कधी, कुठे आणि केव्हा देणार हे आपले लष्कर ठरवेल. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना नमन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आज (ता.१६) बचतगटच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी  महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्य़मंत्री हंसराज अहिर आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांना घरांचे वाटप करण्यात आले. नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरुवात गोंडी, कोलामी, बंजारा भाषेतून सुरुवात केली. आपले आशीर्वाद कायम ठेवा. तुमचा माझ्यावरील विश्वास कायम ठेवा, असेही त्यांनी म्हटले.

मोदी म्हणाले, ''पुलवामात जे काही झाले, त्याबद्दल मी तुमचा आक्रोश समजू शकतो. महाराष्ट्रातील दोन जवान हुतात्मा झाले आहे. ज्या परिवाराने आपल्या सुपुत्राला गमाविले आहे, हे दुःख तेच जाणू शकतात. या हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी संघटनांनी जो गुन्हा केला आहे, त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला पण त्यांना शिक्षा दिलीच जाईल.'' 

देशात 2022 पर्यंत प्रत्येकाकडे पक्के घर असेल. महाराष्ट्रात अडीच लाख घरे बनविण्यात आली आहे. महिला सशक्तीकरणाबाबत यवतमाळ देशातील अग्रणी जिल्ह्यांमध्ये आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले...

  • पुलावामामधील दहशतवाद्यांच्या कृत्यांनतर आपला आक्रोश मी समजू शकतो 
  • दहशतवादी आणि त्यांच्या आकांना योग्य शिक्षा केली जाईल. सुरक्षा दलांना कारवाईसाठी खुली सूट दिली गेली आहे
  • केंद्र सरकारने २०२२ पर्यंत प्रत्येक परिवाराला पक्के घर देण्याचा संकल्प 
  • केंद्र सरकारने पीएम किसना योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार 
  • संपूर्ण महाराष्ट्रात महिला बचत गटाचे खूप मोठे जाळे आहे, आमच्या सरकारने या चळवळीला बळ दिले आहे 
  • वन उत्पादनांच्या मुल्यवर्धनासाठी सरकारचा प्रयत्न. या उत्पादनांच्या हभीभावात ३ पटीने वाढ केली. ५० उत्पादने हमीभावाच्या कक्षेत आणली.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com