agriculture news in marathi, Texture manganese seized in Gangapur | Agrowon

गंगापुरात बनावट खतसाठा जप्त
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत विक्री केंद्राच्या तपासणी दरम्यान सोमवारी (ता.२०) नॅचरल पोटॅश आणि फास्फो जिप्सम या नावाने विनापरवाना विक्री केला जात असल्याचे समोर आले. त्यानुसार नक्कल करून तयार करण्यात आलेला हा खतसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित विक्रेता, वितरक, उत्पादकाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे यांनी दिली.

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत विक्री केंद्राच्या तपासणी दरम्यान सोमवारी (ता.२०) नॅचरल पोटॅश आणि फास्फो जिप्सम या नावाने विनापरवाना विक्री केला जात असल्याचे समोर आले. त्यानुसार नक्कल करून तयार करण्यात आलेला हा खतसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित विक्रेता, वितरक, उत्पादकाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे यांनी दिली.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अशिष काळुशे आणि गंगापूर पंचायत समितीचे खत निरीक्षक आर. ए. पाटील यांनी सोमवारी (ता.२०) दुपारी तीनच्या सुमारास गंगापूर येथील नवकार अॅग्रो या कृषी केंद्रांची तपासणी केली. तेथे गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील किसान भारती फर्टिलायझर्स यांनी उत्पादित केलेल्या नॅचरल पोटॅश या नावाच्या खताच्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या ४१ बॅग (किंमत अंदाजे ३२ हजार १४४ रुपये) आढळल्या, ए. ए. इंडस्ट्रीज, पारोळा, जि. जळगाव यांनी उत्पादित केलेल्या आणि पाटील बायोटेक प्रा. लि. जळगाव हे वितरक असलेल्या फास्फो जिप्सम नावाच्या खताच्या ५० किलो वजनाच्या ३९० बॅग (किंमत २ लाख ८८ हजार ६०० रुपये ) आढळून आल्या.

ही दोन्ही उत्पादने संशयास्पद आढळून आल्यामुळे संबंधित विक्रेत्याकडे खत विक्री परवान्याची मागणी केली. त्या वेळी तो उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे बोगस खतसाठ्याचा पंचनामा करून तो जप्त करण्यात आला. विना परवाना, बेकायदेशीर, बोगस खतांचे उत्पादन, साठवणूक व विक्रीप्रकरणी खत उत्पादक कंपन्या, वितरक, विक्रेत्याविरुद्ध गुणवत्ता निरीक्षक आशिष काळुशे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. 

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...