agriculture news in marathi, There are 62 thousand quintals of seed available for Kharif in Nashik division | Agrowon

नाशिक विभागात खरिपासाठी ६२ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

पाऊस लांबल्याने चिंता वाढली

``खरीप हंगामासाठी महाबीज तसेच खासगी कंपन्या सज्ज झाल्या असल्या तरी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढवली आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे खरेदी करून भाताच्या रोपवाटिका केल्या आहेत. पाऊस लांबल्याचा फटका या रोपवाटिकांना बसला आहे. हंगामाच्या सुरवातीसच भात शेती अडचणीत आली आहे. चांगला पाऊस येईपर्यंत पेरणीची घाई करू नये असे``, इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी आवाहन केले आहे.

नाशिक : नाशिक विभागात पाऊस लांबल्याने चिंता वाढली आहे. याच काळात बियाणे उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाला पुरेसा अवधी मिळाला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्य शासनाच्या महाबीजसह खासगी कंपन्यांनी नाशिक विभागासाठी तब्बल ६२,०८७ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. यात महाबीजकडे २१,०२१ तर खासगी कंपन्यांकडे ४१,०६६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.

विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान बाजारात बियाणे खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. मागणीच्या तुलनेत अधिक बियाणे उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असा दावा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

विभागात खरिपात ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, कापूस-सुधारित, बीटी कापूस आणि नागली या पिकांची लागवड केली जाते. विभागातील सर्व भागात सोयाबीन आणि मका पिकाचा पेरा सर्वाधिक होतो. यात मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल सोयाबीन पिकाकडे व त्यापाठोपाठ मका पिकाकडे वाढला आहे. हे पाहता यंदाच्या हंगामासाठी सोयाबीन २०,७३३ क्विंटल तर १२,६७३ क्विंटल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...