agriculture news in marathi, There are eight talukas in the city yet | Agrowon

नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी पेरणीविना
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ५९ हजार ११८ तर १६६ हेक्‍टरवर मकाची पेरणी झाली आहे. आठ तालुक्‍यांत मात्र गुंठाभरही पेरणी झाली नाही. यंदा रब्बीचे सरासरी क्षेत्र ६ लाख ६७ हजार २६० हेक्‍टर असून आतापर्यंत ६३ हजार २३७ हेक्‍टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. पाऊस नाही, पाणीही उपलब्ध नाही, त्यामुळे रब्बी पेरणीचे क्षेत्र आता वाढेल याची शाश्‍वती संपली आहे.

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ५९ हजार ११८ तर १६६ हेक्‍टरवर मकाची पेरणी झाली आहे. आठ तालुक्‍यांत मात्र गुंठाभरही पेरणी झाली नाही. यंदा रब्बीचे सरासरी क्षेत्र ६ लाख ६७ हजार २६० हेक्‍टर असून आतापर्यंत ६३ हजार २३७ हेक्‍टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. पाऊस नाही, पाणीही उपलब्ध नाही, त्यामुळे रब्बी पेरणीचे क्षेत्र आता वाढेल याची शाश्‍वती संपली आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच पुरेसा पाऊस झालेला नाही. त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसला. पावसाअभावी यंदा पाणी साठवण झाली नाही. परतीच्या पावसावर रब्बी हंगामातील पेरण्या अवलंबून असतात. यंदा मात्र परतीचा पाऊस झालाच नाही. पोळ्यापासूनच पाऊस गायब झाला. गणेशोत्सव, नवरात्र कोरडे गेले. भरवशाच्या हस्त नक्षत्रातही पाऊस झाली नाही. त्यामुळे यंदा रब्बी हंगाम धोक्‍यात आला आहे. आतापर्यंत रब्बीच्या सरासरी सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पेरण्या उरकलेल्या असतात. गव्हाच्या पेरणीलाही वेग येत असतो. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. आतापर्यत चौदा पैकी फक्त सहा तालुक्‍यांत पेरणी झाली आहे.

जेथे काही प्रमाणात पाणी आहे तेथे चारा पिके घेण्याला प्राधान्य दिले जात असून आतापर्यंत ३ हजार ४८० हेक्‍टर क्षेत्रावर चारा पिकांची पेरणी झाली आहे. दरवर्षी साधारण साधारण पंचवीस हजार हेक्‍टर क्षेत्रापर्यंत चारा पीके घेतली जात. यंदा चारा पिकांच्या पेरणीवरही पाऊस नसल्याचा परिणाम झाला आहे. आतापर्यंत रब्बीची नऊ टक्के पेरणी झालेली असली तरी त्यात आता अधिक भर पडेल याची शाश्‍वती नाही. अजूनही पारनेर, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या आठ तालुक्‍यांत गुंठाभरही रब्बीची पेरणी झालेली नाही.

 पीकनिहाय पेरणी (कंसात एकूण सरासरी क्षेत्र)
 ज्वारी    ः    ५९,११८ (४,६९,७८५)
 मका    ः     १६६ (२७,२४५)
 हरभरा     ः     ३,९४८ (१,१८,१०३)
 सूर्यफूल    ः     ५ (८७)

 तालुकानिहाय पेरणी (कंसात सरासरी क्षेत्र) 

नगर

१८,०३४ (१,०७,८४०)

पारनेर ० (८९,१३२)
श्रीगोंदा १३,०४३ (७७,२३१)
कर्जत १०,३१८ (९४,९६०)
जामखेड १३,०६० (६०,८५२)
शेवगाव ७,७९५ (३८,८१६)
पाथर्डी ९८७ (३७,९९०)
नेवासा ० (२३,८०३)
राहुरी ० (२०,५२१)
संगमनेर ० (२७,१५५)
अकोले ० (७,१४४)
कोपरगाव ० (१७,१९३)
श्रीरामपूर ० (४१,४४७)
राहाता ० (२३,१७८

 

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...