लक्षात ठेवा.. भुजबळांच्या बाजूच्या कोठड्या रिकाम्या आहेत : चंद्रकांत पाटील

लक्षात ठेवा.. भुजबळांच्या बाजूच्या कोठड्या रिकाम्या आहेत : चंद्रकांत पाटील
लक्षात ठेवा.. भुजबळांच्या बाजूच्या कोठड्या रिकाम्या आहेत : चंद्रकांत पाटील

मुंबई : 'शिवसेनेला गांडुळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहेत' अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवार (ता. ७) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली. 'छगन भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत' असा थेट इशाराही पाटील यांनी दिला. 

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्‍सच्या मैदानावर महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. या महामेळाव्याला भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता आदी नेते, आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. या महामेळाव्यामध्ये पाटील यांनी भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून भाजप-शिवसेना युतीमध्ये वाद धुमसत असला, तरीही अजित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपचे शिवसेनेची बाजू घेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मित्रपक्ष असलेल्या शिवसेची बाजू घेत पाटील म्हणाले, "शिवसेनेला गांडुळ म्हणणारे राज्याला लागलेली वाळवी आहे. हल्लाबोल यात्रा काढणाऱ्यांनी आधी स्वत:चा गल्ला भरला आहे. आता भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत.'' 

पोस्टरवर गोपीनाथ मुंडे कुठे आहेत?  स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या महामेळाव्याच्या ठिकाणी पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची पोस्टर्स लावण्यात आली आहेत; पण यामध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टर नसल्याने मुंडे समर्थक नाराज झाले. मुंडे समर्थकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणीच जोरदार घोषणाबाजीही केली. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नाराज कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली.

मुख्य व्यासपीठावरही अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. इतर नेत्यांच्या छायाचित्रांना मुख्य व्यासपीठावर स्थान मिळालेले नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com