agriculture news in marathi, There is no expected rainfall in 196 congregations in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात १९६ मंडळांत अपेक्षित पाऊस नाही
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील २२५ मंडळात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी तब्बल १९६ मंडळांत आजपर्यंत अपेक्षित पाऊस पडला नसल्याचे चित्र २ जुलैपर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील मंडळांमध्ये पावसाचा टक्‍का व ओढ जास्त आहे. शिवाय नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील काही भागातही पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील २२५ मंडळात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी तब्बल १९६ मंडळांत आजपर्यंत अपेक्षित पाऊस पडला नसल्याचे चित्र २ जुलैपर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील मंडळांमध्ये पावसाचा टक्‍का व ओढ जास्त आहे. शिवाय नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील काही भागातही पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी तब्बल ४७ मंडळांत अपेक्षित पाऊस नाहीच. त्यापैकी १९ मंडळात तर अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ३० ते ४० टक्‍केच पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील स्थिती यापेक्षाही बिकट आहे. जालन्यातील ४९ पैकी तब्बल ४३ मंडळांत अपेक्षित पाऊस पडलाच नाही. जाफ्राबाद तालुक्‍यात पावसाची स्थिती अत्यंत बिकट असून तालुक्‍यातील कुंभारझरी, वरूड आणि माहोरा या मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनते ३० टक्‍केही पाऊस नाही. जाफराबाद मंडळात ४९ टक्‍के पाऊस दिसत असला तरी त्याच्या बरसण्यात सातत्य नाही. भोकरदन तालुक्‍यातील सिपोरा बाजार मंडळात केवळ २७ टक्‍के तर धावड मंडळात २८ टक्‍के पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी, अंबड, परतूर तालुक्‍यांतील बहुतांश मंडळात अपेक्षित पाऊस पडलाच नाही. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३८ मंडळात अपेक्षित पाऊस पडलाच नाही. धर्मापुरी मंडळात ३२ टक्‍के, अमळनेर मंडळात २४ टक्‍के, पेंडगाव मंडळात ४५ टक्‍के, म्हळसजवळा मंडळात ४३ टक्‍के तर राजूरी व नाळवंडी मंडळात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ १८ टक्‍केच पाऊस पडला आहे. धारूर, शिरूर कासार, गेवराई आदी तालुक्‍यांसह आष्टीमधील निम्म्या तालुक्‍यात अपेक्षित पाऊस नाही.

इतर बातम्या
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
मेहकर तालुक्यात पाझर तलावात बुडून...बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...
कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...